स्वार्थ न शोभणारा

      लाॅकडाऊन न आपल्याला मानवाच्या अनेक रूपाचे दर्शन घडविले , सेवा देणारे करोना योध्दा , भुकेल्या जीवानां अन्न पुरवणारे देवदूत, जीवावर उदार होऊन मदत करनारे सेवाव्रती.
 अनेक चेहरयांचीं  अनेक नाव पण त्यात वसणार  प्रेमळ  मानवी मन.
      ऐकी कडे लोक दुसरयाला मदत करायला पुढे येत होते तर दुसरी कडे या मदत करणारया देवदुतानांच लोकांच्या तिरस्काराचा सामना करावा लागत होत.
   अनेक ड्युटी करून आलेल्या काही डाॅक्टर, तर  दवाखान्यातला इतर कर्मचारी वर्ग  तसेच पोलिसांनाही या तिरस्काराचा सामना करावा लागला.
      हे लोक आपल्या जीवावर उदार होऊन लोकांचा जीव वाचवण्या साठी रात्रंदिवस मेहनत करताहेत आणि अशा योध्द्यांचा सत्कार ,त्यांचा संन्मान करण्या ऐवजी स्वार्थाने बरबटलेले लोक त्यांचा बहिष्कार करताहेत.
    प्रत्येकाने ऐवढे स्वार्थी होऊन स्वत:चाच जीव वाचवायचा ठरवला तर दवाखान्यात एक डाॅक्टर दिसणार नाही,नर्स इतर कर्मचारी हे कोणीच या महामारीच्या काळात दवाखान्यात दिसणार नाहीत.
       आत्ताच काय पण इतर वेळीही या लोकानां संसर्गाचा धोका हा असतोच .तरीही ही सारी आपल कर्तव्य बजावत असतात.
     आपले सैनिक ,पोलिस या लोकांना तर सतत मृत्युच्या छायेत वावरायच असत,कधी ऐखादी गोळी येऊन त्यांचा घात करेल याचा भरवसा नसतो.
      हे लोक जेव्हाही देशावर कुठल्याही प्रकारच संकट येत, नैसर्गिक वा इतर कुठलीही आपदा येते तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यां साठी जीवाचे रान करतात.
      खरतर या संगळ्यांचा आपण  नेहमीच आदर केला पाहीजे,ते जेव्हा जेव्हा एखादया कामगिरीवर असतिल तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या कुंटूबियांची काळजी घेतली पाहीजे,त्याच्या अडचणि सोडवल्या पाहीजेत कारण हे आपल्या देशवासियांचे रक्षण कर्ते   पर्यायाने देशाति  प्रत्येक कुटुंबाचे रक्षणकर्ते आहे. ते त्यांच्या कर्तव्यात कसूर करत नाहीत म्हणून आपण घरात ,देशात सुरक्षीत आहोत आणि डाँक्टर   मंडळी  तर आजारात देव बनून येते ,तेव्हातर आपल्याला जीवन देणारे हे योध्दे रोगाच्या तावडीतून ,मृत्युच्या दाढेतून आपले प्राण परत आणतात.
      मग विचार करण्या सारखी गोष्ट आहे की आपण या लोकांशी कस वागल पाहीजे ?

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल