जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.

     खर आपल्या मराठीतल्या म्हणि आपल्या दैंनदिन जीवनात अगदि चपखल बसतात .अहो म्हणजे काय ? म्हणूनच नाहि का त्या आपल्या संता करवी वा वाङमयातून ,बोली भाषेतून पिढ्यानंपिढ्या चालत आल्यात ,रूढ झाल्यात .

  आत्ता च्या शिर्षकातिल म्हण इथे आठवण्याच कारण हि तसच घडलय हो--

     पाय फ्रँक्चर झालाय आणि चार दिवस आयत मिळाल्यावर वा गिळल्या वर घराची ,प्रकर्षाने स्वयंपाक घराचि आणि घरातिल इतर मंडळिंची लागलेली वाट !, बघून शेवटी ठरवल कस का होईना आपण जमेल तसा स्वयंपाक करायचा .

    झाल मग पहिला दिवस, पोळ्या खुर्चिवर  बसून  केल्यात.पण बसल्या बसल्या पोळीचे काठ जाडच राहायचे,तव्या वरची पोळी अंदाजाने  भाजली की कच्चीतरी रहायची नाही तर जळायची तरी ,उभ राहून करायची सवय दुसर काय?

    मग परत ठरवल काय हरकत आहे स्वयंपाक तर करायचाय फक्त एका पायावर उभ राहून करूया आणि दुसरा जस्ट टाच टेकवायची बस.

      मग नाश्ता ,दोन्हीं वेळचा स्वंयपाक होतोचय त्या मुळे स्वंयपाकघर व इतर मंडळींची होणारी हेळसांड बरयाच अंशी कमी झाली कारण त्यांना आत्ताही बरीच त्यांच्या सवईची नसलेली काम कराविच लागतायत कधि समजुतिन तर कधि नाईलाजान .

      तर अशि ऐका पायाची शर्यत सुरू झालीय मग बरयाच प्रमाणात येणारया मर्यादा व दुसरया वरचा अधिक भार ,थोडा करता करता हातांवर येणारा ताण या ऐक ऐक गोष्टीतुन त्यांच दुखण सुरू झाल.

      आणि उपरति झाली कि ज्यांना कायमच अपंगत्व येत त्यांना किती मोठ्या दिंव्या तून जाव लागत असेल नाहि का?

      बघतांना ते सोप वाटत पण तस काहिच इतकहि  सोप्प नसतच  मुळीच.

     या एकाच बाबीतून आज अनेक संकटातून जाणारया जवळच्या ,दुरच्या ,नात्यातल्या व जगातल्या लोकां बद्दल विचार येऊन गेला की किती मोठी संकट आणि किती किती दिवस वा वर्ष किंवा पिढ्यां पिढ्या (इस्राईल ,अफगाणिस्तान या सारखे अनेक गृह युध्दातून जाणारे देश) हि माणस सहन करतात.

      कल्पनेच्या पलिकडले सारे दु:ख पचवून पुढे जातात ,जातच राहतात.

     गरिबी वा आर्थिक अडचण ज्यांना येते त्यांनाच मग पैस्या बचतिच महत्व कळत ,ति अडचण सोसणारया माणसाची परिस्थीती कळते.मदतिच महत्व कळत .

    आज करोना मुळे  अनेकांचे रोजगार गेलेत तर काहिंना आजारपणात बराच खर्च करावा लागला किंवा काहींच्या घरातली कर्ति माणस गमवावी लागली त्या सगळ्यांनाच आर्थिक फटका बसला यातुन अनेकांच्या जाणिवा जागृत झाल्यात , आपल्या कडे जे आहे त्यातला घास इतरांना देण्याची  सहयोगाची भावना जागृत झाली.

        या करोनाने सगळ्याच स्थरातल्या माणसांना काहीन  काही शिकवलय.

     यातुनच वाटत कि दु:ख आल की देवाची आठवण येते कदाचित ति आपण विसरू नये म्हणून जीवन सुखदु:खाच्या धाग्यांनी विणय नाही का?

      याही पुढे वाटत कि सगळ्यानां कधि ना कधि आपल्या आयुष्यात ही अशी परिस्थीती येऊ शकते याच भान यायलाच हव त्या शिवाय दुसरयावर हसण सुटणार नाही , त्या त्या वेळी त्या त्या माणसाच्या जागी स्वत:ला ठेऊन बघाव मगच आपल्या संवेदना ,सहवेदना होतिल आणि सहयोग सहज होतच राहिल.


        

    

   

 

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल