जगणे
मरणा हून कठिण जगणे झाले,
गडद होणारया अंधारात
प्रकाशा चे कवडसे हि
नाहिसे झाले
कोण ,कुठे ,कधी
जाणार आहे
हे कुणा ना
कधिही कळणार आहे
आहे आज तुझे जे
उद्या असणार नाही
काय नेणार तु
काय घेणार आहे
सिंकदराच्या मोकळ्या
मुठीत जग कुठे सामावले
जगजेत्त्या त्या राजाला ही
सोबत काहीच ना नेता आले
ओझी डोक्या वरली
अन मना तली ही
उतरवून घ्या वी सारी
कसले ते रूसवे
कसल्या त्या शिकायती
माफ करूनि आपुल्यांना
आपणही मुक्त व्हावे
गात गाणे आपुल्याशीच
जगावे अन जगुद्यावे
Comments
Post a Comment