Posts

ब्रँड के आगे लाचार ,न समझे गरिब का हाल

Image
  इथे शाँपिंग करता हजारात तरी विकत घ्यावी लागते बँग  ते अरबो पति ,जपताय त्यांच नाव ,इमेज, पेपर बँग वापरून आणि घेतोच आपण ती पैसे जास्तिचे देऊन  इधे ही ट्राँली भर सामान ,कधि काही हजारावर मिॆळते पिशवी कापडी Freee,freee तर कधि घेतोच विकत झक मारून पिशवी तिच. पण --------- यांच्या कडे करतो जास्तच डिंमाड ,पिशवी नाही दिली तर सोडतो दुकान , चार प्रकार ची फळ चार कॅरीबँग यासाठी देतो कुठे आपण जास्त दाम ना तरस इनपे आता है ,न गरिबों से काई हमारा नाता है पर क्या हमे सच अभि भी नजर नही आता हैं आदत अभि बदललो ,तुम्हारे पाॅकेट के साथ कुछ चिंता धरति की भी करलो "Say no to plastic ,please use clothe bags 🙏

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल

Image
   कौन बनेगा करोडपति च्या मंचावर आलेल्या काहि स्पर्धकां पैकी हे दोन शिक्षक ,त्यांची शैक्षणिक पात्रता वाखानण्या जोगी आहे पण तरिही त्यांना त्यांच्या विद्या दानाच्या कार्याचा मोबदला त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणात मिळत नाही.       आईवडिलांनी कष्टाने ,आपल्या पोटाला चिमटा देऊन उज्वल भविष्याच्या आशेने मुलांना शिकवले. पण या हाडाच्या शिक्षकांना त्या कामातुन कुटुंब चालवण कठिण होत . मग काही जोडधंदा वा प्रसंगी मजुरी करूनही त्यांना आपल्या कुटुंबाच्य उदरनिर्वाहाला हातभार लावावा लागतो.           का हि अवस्था व्हावी ? तर शिक्षण क्षेत्राला नफा देणारा धंदा बनवणारया /समजणारया शिक्षण सम्राटानां जसा विद्यार्थ्यान कडून फी च्या रूपात गडगंज पैसा लाटायचा असतो तसाच शिक्षकाची नोकरी देण्यासाठी त्यांच्या कडून लाखो रूपये घेतले जातात.        मग येवढा पैसा देणारा कर्मचारी शिक्षक म्हणून नोकरी करत नाही तर ते पद त्याने विकत घेतलेल असत आणि सहाजिकच त्याला या पैशाच तिळमात्र ही द्यान नसत आणि शिक्षण देण्याची तळमळ तर नसतेच ,ते फक्त मस्टरवर सहि करणारे नामधारी...

We are the dumping ground for all that world can reject

Image
     हे फक्त एक चित्र ,माझ्या म्हणन्या चा प्रत्यय यावा व चित्र बघुन वाचायची इच्छा व्हावी म्हणून .        आज आपण भारतिय जे आपल्याच संस्कृतिचा, संस्कारांचा भाग आहे तेच अगदि फाॅरेन रिटर्न किंवा तिकडच लेबल लावून येत ते अंगिकारण म्हणजे पुढारले पण किंवा आधुनिक जीवनशैली आत्मसात केली अस मानतो.    योगा हा भारताने जगाला दिला अस म्हणतात आणि ते खरच आहे. पण याची ओळख आपल्याला जास्त कधि झाली किंवा तो एक व्यायाम किंवा वर्कआऊट किंवा आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा भाग म्हणून आपण केव्हा स्विकारल तर जेव्हा इंटनॅशनल योगा डे साजरा व्हायला लागला तेव्हा .आता काही म्हणतिल कि आम्ही बरयाच वर्षां पासुन करतोय तर ते खरोखरीच जागृत नागरिक म्हणजे काय ट्रेंड आलाय म्हणून तस करतोय अश्यातले नाही तर ते माझ्या आरोग्या साठी उत्तम वा महत्वाच आहे म्हणून .       खरतर योगा फक्त काही आसनांन पुरता मर्यादित नाही तर ती एक उत्तम जीवनशैली आहे. पर्यावरण पुरक ,संयमी ,संतुष्ट, प्रेरणादाई ,सेवा वा एंकदरीत स्व:कल्याणातून विश्व कल्याणाकडे नेणारा जीवन मार्ग  . ते कस? ते आज नाही परत कधित...

भारत के युवा जाग जा

Image
  आहोत आपण सुखी पण सुख सांभाळाव लागत ते सांभाळण्या साठी सतत काही तरी नव नव कराव लागत असला समृध्द वारसा हे आपल भाग्य आहे करंटे  निघालो हे देशाच दुर्भाग्य आहे          " भारत के युवा जागजा" हमारे हवाले कर गये है वतन वो शहिद शहादत की उनकी क्या किमत नही झगडेगें आपस में तो, लड मरेंगे और जन्नत सा देश हमारा  फिरसे क्या गुलाम करेंगे युवा हो तुम, 'ताकद' देश की  सारे जहाँ मे न कोई इतने जवाँ है ठाँन लो के अब अपने देश की सेवा हम करेंगे सारे जहाँ में हम नाम अपने वतन का ऊँचा करेंगे  न केसरी ,न निला ,न हरा धरेंगे  हम हिंद के बच्चे है  बस हाँथ में यारों तिरंगा धरेंगे

आंधळा राजा ,"मतदार" आणि धूर्त लबाड लोकसेवक

Image
   आम्ही आंधळे नी मुर्ख चिकटवले लेबल जाती-धर्माचे अन घेतले झेंडे ,भगवे ,निळे अन हिरवे यातच हरवलो मग------- दिसलाच नाही कावा त्यांचा आपल्याला गुंतवून या गुंत्त्यात ते गले लठ्ठ झाले खाल्ल सार सार काही  चारा ,कधि डांबर , कधि रेती ,कधि राशन  कधि घर तर कधि शवपेट्या ही शहिदांच्या खाल्ल्या तुकडे टाकुन आश्वासनांचे ,  घोषणांचे आरक्षणांच्या  तर कधि मंदिरांचे आणि पुतळ्यांचे हे टाळूवरच लोणी खाऊ लागले आणि आपल्याला आपल्याच हक्कांसाठी भिकेला लावले किती दिवस जगणार आहोत हे गांधारीच जिन आपल्यातल्याच कुणाला तरी व्हाव लागेल कृष्ण!        कली युगातले हे कली आहेत पांढरे कपडे आणि काळी कर्णी   व्यवस्था झाली द्रोपदी आपल्यातल्याच काही युधिष्टिरांनी लावला तिच्यावर डाव जागा आत्ता तरी --+++ पट्टया काढा स्वार्थाच्या ,जाती -धर्माच्या खावू नका यांनी दिलेली  भेदभावाची गोळी आपल्याच तर मढयावर शेकताहेत  ते त्यांची राजकारणाची पोळी

नवा दिवस नवि आश

Image
  रोज नवे रंग लेऊन येते सकाळ नव्या आशेचा नवा प्रकाश रात्रीच्या उदरातून उगवणारा सुर्य अस्ताला गेलेल्या सकाळचे रंग हे चक्र असच चालणार असत तेच चक्र तर आपल्या ही आयुष्याच असत कधि दु:खं तर कधि सुखं ,येत जात राहतात रोजच नवे काही धडे देऊन जातात  शिकायच असच प्रत्येक धड्यात काही तरी त्याशिवाय ही जीवनाची परिक्षा देता येत नाही पडतो ,म्हणून तर उठायच शिकतो येणारा क्षण जाणारच तर असतो आज आहे ते उद्या काल होणारच तर असत अडचणि फार कुरवाळत बसायच नसत त्या सोडवून पुढे तर जायचच असत             अस करत करत तर             आयुष्याच गणित सुटत          कुठे वजाबकी तर कुठे गुणाकार होतो सरते शेवटी आयुष्याच्या फक्त शुन्य तेवढा उरतो

आपण बघे

Image
       कोकणातल्या दरडी कोसळण्याच्या घटना ,कोल्हापुर, सातारा भागातले पुर या आपल्या  महाराष्ट्रातल्या मागच्या वर्षी आणि याहि वर्षी घडलेल्या काही घटना .हे आपल्या भागात घडणार नाही असाच काहीसा समज इतर भागातल्या नागरिकांचा असावा ! नाही , तो असतोच ! मग ? आपण काही दिवस हळहळतो, यंत्रनेला दोष देतो , काहि लोक मनापासुन मदत करतात अगदि तन-मन- धनाने तर काहि फोटो, प्रसिध्दि किंवा आपले महान पण गायले जावे म्हणून  मदत करतात .     वरचा फोटो एका वर्तमान पत्रातला आहे जो ऐरविही दुर्घटनांची हिच कारण असतात हे दाखवतो . मग हि कारण गेल्या किती तरी वर्षां पासुन आपल्याला माहित आहेत म्हणजे मुंबई व पुण्यातल्या भयंकर पुराच्या वेळीहि तेच सांगितल गेल नदिपात्रात भर टाकणे ,अनधिकृत बांधकाम ,नाले/ गटारीं मधे बेशुमार अडकलेल प्लॅस्टिक , वृक्ष तोड,संपुष्टात आलेली खारफुटी व नदिकाठावरची संपवलेली झाड  , जी पुराला काही प्रमाणात अटकाव करू शकतात आणि पर्यावरणाचा असमतोल ज्या मुळे वातावरण व ऋतूचक्रात बदल घडतात.              या सगळ्यात पर्यावरणाचा असमतोल घालव...