दुरितांचे तिमीर जावो |विश्व स्वर्धम सुर्ये पाहो|| किती सुदंर आहे ना ,ग्यानेश्वरांनी पसायदानात लिहीलेल ,माडंलेल हे. खरतर विचार,लिखाण या गोष्टी सुदंर आहेत तर त्या आपल्या सगळ्या साठी महत्वाच्या आणि आपल्या सर्वांच आयुष्य सुदंर करणारया. सारयांनचा निर्माता ताे परमपिता परमात्मा ,एकच आहे हे आपण ऐकतो, म्हणतो पण मानत नाही का? शाळेत असतांना म्हटली जाणारी प्रतिग्या ,"सारे भारतीय माझे बांधव आहेत,--------",किंवा शुभम करोती ,कल्याणम म्हणनारे आपण आपल विश्व इतक संकूचित करून टाकतो की आपल्या उंबरयाच्या बाहेर आपल कुणीच नाही असच वागत असतो. आपल्या कातडीचा रंगच तो काय वेगळा पण सारेच मानव म्हटले जाणारे दोन पायाचे प्राणी हाडामासाचे ,अंगात लाल रक्त ल्यायलेले,नाक कानाचा आकार वेगळा असला तरी सामान्य पणे त्यांची संख्या प्रत्येकात सारखीच. तरीही किती भेदभाव रंगाचा, जातीचा,धर्माचा ,देशाचा. प्रतेक जण ज्या कुठल्या देवाला मानतो तोही सर्वांवर प्रेमच तर करायला शिकवतो,माफ करायला शिकवत...
👌👌👌👌
ReplyDelete