बाबा ची बदललेली रूप
आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल.
आणि कालच मी एका वर्तमान पत्रात वाचल कि लाॅकडाऊन च्या काळात बाबा आणि मुलांच्यात जवळीक निर्माण झालीय अस एका अभ्यासा द्वारे दिसून आलय.
खरच अस झालय कारण लाॅकडाऊन सुरू झाल तेव्हा आणि आत्ता बाबा आणि मुलां मधले संवाद बदललेत ,नात अधिक जवळच झालय .आज त्याच सगळ्या प्रवासातल्या स्टेजेस मी तुमच्याशी शेअर करणार आहे.
तर पहिले म्हणजे लाॅकडाऊन सुरू झाल तेव्हा बाबा स्वत:शी काय बोलतोय ते बघुया( याला अपवाद आहेत जे बाबा मुलांना जास्त धाकात ठेवत नाहीत , त्याच्यां जवळ,सोबत असतात.)
" हरवलेला मी" यात बाबा म्हणतोय
मी ही हसायचो वाटत कधी
कारण दिसतात गालावर दोंन्ही बाजूला
हसल्यावर पडणारया खळ्या
मीही असायचो कुंटुबाचा पार्ट
दिसतोय फोटों मध्ये ,जुन्या कपाटात
खेळायचो मीही बदाम सात,
चौकट ,कँरम अन रंगायचे
चेस चे डाव माझ्या सोबतही
हो आठवतय पुसटस आत्ता तेही
टेबलावर थाळ्या चमचे वाजवत मीही बाळ व्हायचो
मुलांची तोंड रंगवत कधी, स्वत:च ही रंगवायचो
आत्ताश्या मी याच्यांत कुठेच दिसत नाही
हे मला यांच्यात घेत नाहीत कि
मीच यांच्यातला आत्ताशा होत नाही
मीच एकटाच कंटाळलेला असतो
बराचसा म्हातारा म्हातारा दिसतो
सहजच आरशा समोर उभा होतो एकदा
विचारायला लागला तोच मला
कुठे हरवलायस मित्रा
तुला आत्ता हसता येत नाही का रे?
गेले कुठे तुझे मन दोस्ता रे?
मना वरची धुळ आत्ता पुसुन टाक
साचलेल मळभ आत्ता घासून पुसून धुऊन टाक
डोकाऊन बघ स्वत: च्याच आत
आहेस तू तिथेच पुर्वी सारखाच बस आत्ता तु त्यालाच परत बाहेर काढ
बस जरा जरा हस जरा😌
आत्ता या हरवलेल्या बाबाला मुलगा काय म्हणतोय ते बघुया.त्यान स्वत: भोवती घातलेल कुंपण तोडून लेक त्याला लहानपणीचा बाबा परत मागतोय.
"कुंपण"
बाबा मला लहानपणी डोक्यावर बसवायचा
खांद्यावर घेऊन कुठे कुठे मिरवायचा
बाबा माझा लहानपणी माझा मित्र व्हायचा
कधी पाठीवर बसवून घोडा घोडा खेळवायचा
बाबा माझे खुप खुप लाड करायचा
आई पेक्षा तो मला जरा जास्तच आवडायचा
ती आपली सततच रागवत असायची
पण बाबा घरात असला की तिच धाकात दिसायची
पण जसा जसा मी मोठा होत गेलो
बाबा पासून मी खुपच दुर झालो
त्यान त्याच्या भोवती कुंपण घालून घेतल
कधी अपेक्षांच तर कधी त्याच्या मोठेपणाच
कधी माझ्या वागन्याने ,त्याच्या रागवण्याच
कुंपण अधीक उंचउंच होत गेल, ते मला अदयाप नाहीच ओंलाडता आल
कुंपणाच्या अलीकडे मी आणि आईच फक्त राहीलो
तिही रागवायची,पण तिची बाजू ही मांडायची
अन माझीही येकून घ्यायची
मग तिच आणि माझच वेगळ गुळपिट जमल
बाबान घातलेल कुंपण आता काटेरी झाल
बाबा असतोस तू आम्हाला आमच्या सोबत हवा
तुझ्या सोबत परत मुल होऊनच खेळायच असत
तुझ्या पोटाशी येऊन निजायच असत
हात तुझा हवा असतो डोक्या बरोबर खांदयावरही
करायची आहे बाबा आता दोस्ति तुझ्या बरोबरही
तोडून ते कुंपण तुच आता इकडे ये
आणि माझा लहानपणीचा बाबा मला परत दे 👪
आत्ता हळू हळू बाबा सगळ्यांच्यात मिसळायला लागला मग काय म्हणतोय लेक ----
हसरा चैतन्यान भरलेला बाबा आज मिळालाय
आमच्यात येऊन बसणारा ,भुली--हुई यादें ,गाऊन चिडवणारा
बाबा आज दिसलाय
टि.व्हि . समोरच्या स्पेशल जागे साठी माझ्याशी भांडणारा बाबा आज दिसलाय
माझ्या आवडीचा खाऊ ,मलाच दे त्याला नको देऊ चिडवत
हळूच मुलांन साठीच राहुदे सांगणारा बाबा आज दिसलाय
ओट्यावर पावसाचा आनंद घेत माझ्या सोबत भजी शेअर करणारा बाबा आजच भेटलाय
रंगतोय डाव चेसचा अन गाण्यांची मैफील सजतेय
रोज रोज वेगवेगळ्या खाण्याच्या डिंमाडस् न सार घर गुंजतय
मस्त भेळेवर कच्च्या कैरीच्या फोडी,"अजून टाक,छान लागत"
म्हणून बाबा सांगतोय
ओट्या जवळ हळूच,आईच्या मागे उभा राहत बाबा
जरास मिठ अजून टाक अस सुचवतोय
बालपणीच्या त्याच्या आठवणी सांगत
बाबा आज ,सुखावणारया पावसा सारखा आनंद देत बरसतोय
मायकल जॅक्सनचा मूनवाॅक , अन टपोरी डांस करून आज मला हसवतोय
परफेक्ट फॅमिलीच्या पिक्चर फ्रेम मधे
बाबा मला माझ्या सोबत खांदयावर हात ठेऊन समाधानान,
स्नेहभरल्या नजरेन माझ्या कडे बघतोय
असा माझा बाबा म्हणून मिच माझ्या नशिबावर
आज नाज करतोय.
तर या लाॅकडाऊन न बाबा अस्सा मुलांना मिळालाय.

खरच लाकडाऊनमुळे मुलांना बाबांचा सहवास मिळाल्याने मुलं सुखावली नेहमी कामाच्या तणावात असणारे बाबा आता मुलांन सोबत खेळताना दिसतात गप्पागोष्टी करताना दिसतात
ReplyDelete