Posts

Showing posts from July, 2021

धरणीचे अश्रृ

Image
   आज निसर्ग संवर्धन दिवस ,वरच चित्र वास्तवाच भान करून देणार , आणि रोज पुर ,ढग फुटी , ढासळणारया दरडी याच्या चित्रां मधुन निसर्गाचा दिसणारा आक्रोष ?????           संथ वाहणारया नद्या कोपल्या                 ढासळणारे डोंगर कडे                  विध्वंसाचे रूप वेगळे                 वणव्या ने ही  कहर जाहला                    काळवंडली जंगले                 राख झाली वनराई ती                 आक्रोष चोही कडे              पोरकी झाली किती पाखरे                   वने रिती  ,मुकी           धरणीला त्या तडे पडले              उभे डोंगर पोखरले         ...

पाऊस

    पाऊस जो अनेक कवीनां प्रेरीत करतो ,पाऊस ज्याच्यावर असंख्य गाणी ,कविता कित्येक वर्षा पासुन लिहिल्या गेल्या ,लिहिल्या जातायत आणि पुढे ही लिहिल्या जातिलच.          प्रत्येका साठी हा वेगळाच असतो काहीं साठी मस्त भटकंति तर काहिं साठी वाफाळणारी अद्रक वाली चाय काहिं साठी , भजींचा बेत तर काहीं साठी निसर्गाची निवांत भेट.      अरे यमक जुळल का ?😄  असच होत हा मोह अनावर होतो मग उगाच वाटत जमतय की ,पण त्यात इतकी काही ताकद नसते कि ते इतरांना हि आवडेल पण हा पाऊस वैरि या गोष्टीं सांठी उचकवत(प्रेरित करतो किंवा मोहित करतो) असतो    फक्त पाऊस पडतांना पाहण ही खुप सुखाऊन जात.रिमझिम पाऊस ,गार वारयाची झुळुक जेव्हा काही थेंब अंगावर घेऊन येते तेव्हा काय वाटत !---------,शब्दात नाहीच वर्णन करता येत ,काहि अनुभव आपले आपणच घ्यायचे असतात आणि त्याची अनुभुति अर्थातच माणसा परत बदलत असते.             तर enjoy मग -----    पाऊस लाडका हवा हवासा   मन तृप्त ,स्वच्छ करणारा सखा पाऊस जलधारा ,पाऊस उनाड वारा पाऊस नयन ...

भेटी लागे जीवा लागली से आस

Image
     अगा पांडुरंगा ये धाऊन बा आता      जीव कसाविस झाला दर्शनास तुझ्या       धाव घेती डोळे पढंरीच्या वाटेवर          डोळ्यात आस आहे तुझ्या भेटीची रे      सावळे सुदंर रूप तुझे माऊली        दिसे ठाई ठाई भेटु कशि तुला माऊली विठाई चंद्रभागेचा तीर मारीतो रे हाक तोडुन पाश संसाराचे  येत होत्या लेकी तुझ्या  माहेर ची होेते त्यांचे  वाळवंटी पंढरीच्या  तुळशी वृंदावनीची  रूसली सावळ्यारे  टाळ -मृदंग झाले मुके चिपळ्या ही देवा आता शांत झाल्या तुझ्या विरहात अश्रृधारा बरसल्या

" Do nothing " हे चाॅकलेट देत सांगायच का?

Image
  आज लहान मुल आणि तरूण(बरयाच मोठ्यांचाही) चाॅकलेट अतिशय प्रिय पदार्थ आहे  त्याची हि जाहिरात.      खरतर जाहिरात ति तद्दन वस्तु कशि महत्वाची व योग्य आहे हे पटवून देत असते काहि वेळा त्यात अतिशयोक्ति ही असते आणि त्यावर बरेच जोक्स हि होतात .       "संतुर " साबणाची जाहिरात ज्यात  स्री कशी साबणा  मुळे आई असुनहि तरूण दिसते  अस दाखवलय मग पुरूषांच्या बाबतितही तस होत या अर्थाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत असतात.      " दाग अच्छे है " म्हणत मदत करायला शिकवणारी जाहिरात. स्रीला हि तिच अस अवकाश आहे हे दाखवणारी(तेल/चहा) जाहिरात , मुलां नाही मुलीं सारख सगळ काम आल पाहिजे हे सांगणारी जाहीरात, काहि जाहिरातित तर आत्ता पुरूषही घरातील मुल व पत्निला सर्व करतांना दाखवतात तर काहि याच्यात मशिन मधे कपडे टाकतानां.      हि काहि जाहिरातिंची उदाहरण जी समाज परिवर्तन व मुल्ये शीकवणीरी .       पण वरची चाॅकलेटची जाहिरात ,काय सुचित करते? तुम्हि स्वत:तच मग्न व्हा ? कुणि मदत मागत असेल तर करू नका?  (जरी त्या प्रसंगात त्या...

सकारात्मक चॅलेंज Let's see,accept & chage your mistakes

Image
   दिव्य मराठीच्या एका विशिष्ट पानावर अश्यातच सुरू झालेली ही चॅलेंजेसची गंमत .     सुरूवातिला कौटुंबिक स्थरावर वेगळे पण याव ,घरात हसत खेळत नविन काहि तरी करून मुल व मोठ्यांना सहभागी होता येईल अश्या छोट्या छोट्या कृति नीं सुरू झालेल हे , आज काहि तरी मोठ्ठ पण स्व: परिवर्तनात महत्वाची भुमिका बजावणार अस चॅलेंज.          प्रत्येकाच्या हातुन चुका या होतच असतात ,लहाणपणि लहान तर मोठे पणि लहान -मोठ्या😉 (हो बरिच मंडळी सहमत असतिलच)            लहाणपणि  होणारया चुका बालिश ,सहजच माफि मिळण्या सारख्या आणि बरयाच अंशी बदल घडवून आणनारया .       बालपणि मुलांना मोठ्यां कडून विशेष सल्ला वा ताकिद असते कि चुक झालि तर ति कबूल करावि आणि काहि घरात ति परत  होवू नये म्हणून ," देवा समोर उभा रहा ,कान पकड आणि म्हण मी परत अशि चुक करणार नाही."        अस चुकिच परिमार्जन वा देवाला साक्षि ठेवून ती परत न करण्या ची शपथ दिली जाते.         पण जस जस मोठ होत जातो तशी चुकांची पध्दत व तिव्रता ...
Image
           रास्ते पथरिले ,है ये तेरे लिए           मुश्किल मंजीले भी है          दौर है कठिनाईयों का          पल पल अनजानासा                  हाथ थामले है बंदे        अब तु हिंमत और आशाओं का       कोशिश करना न छोडना तु      न डरके ,हार जाना          मुश्किलो के इस सफर में    ख्वाब देखना ना तु छोडना   है सफर अनजाना ,डगर भी कठिन है        पर  गिरके ऊँठना         हार के जीतना  यँही तो जींदगी है यँही तो जींदगी है            

Don' t judge a book by its cover

Image
    पूर्वि एकदा शांता बाईंच  "पावसा आधिचा पाऊस" हे पुस्तक वाचल होत , त्यात त्यांनि एका चित्रांला बघुन लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असु शकतात याचा छान संदर्भ दिलाय  त्याची आठवण राँबिन शर्मा च हे पुस्तक वाचतांना आली.       गम्मत अशि कि मी पुस्तकाच नाव वाचुन ठरवल कि यात काय असेल कि ,हे जग ,यातली नाती  स्थाई नाहित तर तु त्यात अडकु नकोस , निर्विकारी हो ,मोह सोड अस बरच .      किंवा      "जण पळभर ंम्हणतिल हाय हाय" या  भा.रा.तांबे यांच्या कवितेची आठवण  झाली.     मग सहजच पुस्तक चाळायला घेतल तर --------         पुस्तक अगदिच वेगळ ,जीवन मुल्ये शिकवणार ,जीवनात काय? ,कस? ,केव्हा? कराव अस बरच सांगणार .     पहिल्या लेखात ,"Discover your calling "     तुमच्यातल अस बेस्ट शोधा,त्या नुसार मार्गक्रमण करा हे सांगताना ते सांगतात कि त्या  साठी तुमच्या हातातला जाँब सोडा अस नाही तर जे तुम्ही करता त्यात बेस्ट करा ,झोकुन द्या. तेव्हाच ते  गांधीजींच्या विचाराचा संदर्भ ...