धरणीचे अश्रृ
आज निसर्ग संवर्धन दिवस ,वरच चित्र वास्तवाच भान करून देणार , आणि रोज पुर ,ढग फुटी , ढासळणारया दरडी याच्या चित्रां मधुन निसर्गाचा दिसणारा आक्रोष ?????
संथ वाहणारया नद्या कोपल्या
ढासळणारे डोंगर कडे
विध्वंसाचे रूप वेगळे
वणव्या ने ही कहर जाहला
काळवंडली जंगले
राख झाली वनराई ती
आक्रोष चोही कडे
पोरकी झाली किती पाखरे
वने रिती ,मुकी
धरणीला त्या तडे पडले
उभे डोंगर पोखरले
वर्षा वने संपली
प्राण्यांची वस्ती हरवली
वितळणारा बर्फ देई
संकटाचे नवे इशारे
कसला विकास हा
अन खोटे जाहिरनामे
धरणीचा रे श्वास कोंडला
कारखान्याच्या धुराने
हिरवि हिरवि राने हरवली
सिमेंटची जंगले वसवली
या उंच मनोरयात हरवले
आकाशीचे चंद्रतारे
रसायनाच्या मारयाने सारी
जलाशये नासवली
जलचरांचा ही नाश झाला
बोथट झाली मने
विसरली वृक्षवल्ली सोयरे
आता तरी जाग मानवा
घेई निसर्ग संवर्धनाचा वसा
स्वच्छ हवा अन निर्मळ पाणी
वृक्ष हिरवे रानो रानी
Comments
Post a Comment