पाऊस


    पाऊस जो अनेक कवीनां प्रेरीत करतो ,पाऊस ज्याच्यावर असंख्य गाणी ,कविता कित्येक वर्षा पासुन लिहिल्या गेल्या ,लिहिल्या जातायत आणि पुढे ही लिहिल्या जातिलच.

         प्रत्येका साठी हा वेगळाच असतो काहीं साठी मस्त भटकंति तर काहिं साठी वाफाळणारी अद्रक वाली चाय काहिं साठी , भजींचा बेत तर काहीं साठी निसर्गाची निवांत भेट.

     अरे यमक जुळल का ?😄  असच होत हा मोह अनावर होतो मग उगाच वाटत जमतय की ,पण त्यात इतकी काही ताकद नसते कि ते इतरांना हि आवडेल पण हा पाऊस वैरि या गोष्टीं सांठी उचकवत(प्रेरित करतो किंवा मोहित करतो) असतो

   फक्त पाऊस पडतांना पाहण ही खुप सुखाऊन जात.रिमझिम पाऊस ,गार वारयाची झुळुक जेव्हा काही थेंब अंगावर घेऊन येते तेव्हा काय वाटत !---------,शब्दात नाहीच वर्णन करता येत ,काहि अनुभव आपले आपणच घ्यायचे असतात आणि त्याची अनुभुति अर्थातच माणसा परत बदलत असते.

            तर enjoy मग -----

   पाऊस लाडका हवा हवासा 

 मन तृप्त ,स्वच्छ करणारा सखा

पाऊस जलधारा ,पाऊस उनाड वारा

पाऊस नयन सुख ,पाऊस न शमणारी भूख

     पाऊस सर अविरत सर सर

   पाऊस स्वर रूण झूण झिम झिम

   पाऊस पाऊस श्रावण चाहूल

     पाऊस पाऊस मोर पिसारा

    पाऊस पाऊस फूल पसारा

पाऊस पाऊस मृदेचा  गंध मोहक

पाऊस पाऊस इंद्रधनुचा रंगित पाऊस

पाऊस पाऊस निसर्गाचे मधुर संगीत पाऊस




     

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल