" Do nothing " हे चाॅकलेट देत सांगायच का?
खरतर जाहिरात ति तद्दन वस्तु कशि महत्वाची व योग्य आहे हे पटवून देत असते काहि वेळा त्यात अतिशयोक्ति ही असते आणि त्यावर बरेच जोक्स हि होतात .
"संतुर " साबणाची जाहिरात ज्यात स्री कशी साबणा मुळे आई असुनहि तरूण दिसते अस दाखवलय मग पुरूषांच्या बाबतितही तस होत या अर्थाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत असतात.
" दाग अच्छे है " म्हणत मदत करायला शिकवणारी जाहिरात. स्रीला हि तिच अस अवकाश आहे हे दाखवणारी(तेल/चहा) जाहिरात , मुलां नाही मुलीं सारख सगळ काम आल पाहिजे हे सांगणारी जाहीरात, काहि जाहिरातित तर आत्ता पुरूषही घरातील मुल व पत्निला सर्व करतांना दाखवतात तर काहि याच्यात मशिन मधे कपडे टाकतानां.
हि काहि जाहिरातिंची उदाहरण जी समाज परिवर्तन व मुल्ये शीकवणीरी .
पण वरची चाॅकलेटची जाहिरात ,काय सुचित करते? तुम्हि स्वत:तच मग्न व्हा ? कुणि मदत मागत असेल तर करू नका? (जरी त्या प्रसंगात त्या मुलाच्या मदत न करण्याने आजी ला ईजा होण्या पासून वाचवले असले तरीही).
आज यातल बघ्याची भुमिका घेण जास्तच खटकल कारण अपघात स्थळी जखमिंना मदत करायची सोडून लोक खुशाल मोबाईल मधे चित्रीकरण करत बसतात.
गेल्या काहि दिवसात अशे प्रकार पेपर मधे सर्रास वाचायला मिळताय.
मग प्रश्न असा पडतो कि आपण सगळे झापडं बाधून होईल ते बघतो का ? तर नाही, कारण परत समाज माध्यमां वर एखादि टिका केली जाते किंवा कुणितरी एखाद्या व्यक्तिची वा त्याच्या कृतिची निंदा करत तेव्हा आपण अगदि दिलखुलास ,मोबाईलचे बटन दाबत त्याचा निषेध करतो ,लाखोली वाहतो वा त्याच भाषेत ट्रोल करतो नाही का?
आपला आदर्श किंवा सामाजिक बांधिलकि फक्त येवढीच आहे का?
हो एक विसरलेच कि ,अहो नाही का काहि लोक त्याच मांध्यमाचां वापर रिकामी डोकि ( हो रिकामिच ,कारण काम करायच नाहि आणि उपलब्ध डाटा संपवणे ऐवढच काम असणारयाना काय म्हणायच ,ओहह रिकामटेकडी)भडकवण्या साठी करतात आणि हे हिपनोटाईज झाल्या सारखे पुढचा मागचा विचार न करता हल्ले करतात ,तोड फोड करतात.
तर अस हे मोहाच मायाजाल ,पुर्विहि समाज जागृति साठी संतानी भारूड ,किर्तन केले ,पुढे पथ नाट्य ,सिनेमे ,भाषण यातून ति केली गेली पण आत्ता अदृश्य (प्रत्यक्षात समोर नसणारे या अर्थाने) माध्यम मुलांवर,तरूणां वर व एकंदरित समाजावर काय प्रभाव टाकतायेत हे बघणे वा त्याचा अभ्यास करणे ,चिकित्सा करणे हि आपलिच जबाबदारि आहे व चुकिच्या गोष्टिंचा निशेध करणे हि हि.
बघा पटतय का?पटल तर कुठल्या प्रकारे निशेध करायचा हे तुमच तुम्हि ठरवा ,मी आपला विचार मांडला.
Comments
Post a Comment