सकारात्मक चॅलेंज Let's see,accept & chage your mistakes


   दिव्य मराठीच्या एका विशिष्ट पानावर अश्यातच सुरू झालेली ही चॅलेंजेसची गंमत .

    सुरूवातिला कौटुंबिक स्थरावर वेगळे पण याव ,घरात हसत खेळत नविन काहि तरी करून मुल व मोठ्यांना सहभागी होता येईल अश्या छोट्या छोट्या कृति नीं सुरू झालेल हे , आज काहि तरी मोठ्ठ पण स्व: परिवर्तनात महत्वाची भुमिका बजावणार अस चॅलेंज.
         प्रत्येकाच्या हातुन चुका या होतच असतात ,लहाणपणि लहान तर मोठे पणि लहान -मोठ्या😉 (हो बरिच मंडळी सहमत असतिलच)
        
  लहाणपणि  होणारया चुका बालिश ,सहजच माफि मिळण्या सारख्या आणि बरयाच अंशी बदल घडवून आणनारया .
      बालपणि मुलांना मोठ्यां कडून विशेष सल्ला वा ताकिद असते कि चुक झालि तर ति कबूल करावि आणि काहि घरात ति परत  होवू नये म्हणून ," देवा समोर उभा रहा ,कान पकड आणि म्हण मी परत अशि चुक करणार नाही." 
      अस चुकिच परिमार्जन वा देवाला साक्षि ठेवून ती परत न करण्या ची शपथ दिली जाते.
        पण जस जस मोठ होत जातो तशी चुकांची पध्दत व तिव्रता वाढत जाते(सन्माननिय अपवाद वगळता)
       आणि इतरां कडून  आपल्या त्या चुका  कळल्यावर मिळणारया क्रिया /प्रतिक्रियांच्या भितीने त्या कधिच कबूल केल्या जात नाहित .
          हो पण वयाच्या एका टप्प्यावर त्याची प्रकर्शाने जाणिव होतेच म्हणा.
     यात अगदि महान व्यक्तिची उदाहरणं प्रेरणादायी ठरतात जे त्यांच्या आत्मचरित्रात बहुतेकदा वाचनात येतात.
    असो ,-----आपण सामान्य माणस मग या चॅलेंज ला आपल्या पुरत स्विकारूया ( पब्लिकली स्विकारायचे गट्स् प्रत्येकात नसतात,म्हणून )आणि स्वपरिवर्ताच्या वाटेवर आत्मपरिक्षण करून मार्गक्रमण करूया तर!😌

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल