भेटी लागे जीवा लागली से आस
अगा पांडुरंगा ये धाऊन बा आता
जीव कसाविस झाला दर्शनास तुझ्या
धाव घेती डोळे पढंरीच्या वाटेवर
डोळ्यात आस आहे तुझ्या भेटीची रे
सावळे सुदंर रूप तुझे माऊली
दिसे ठाई ठाई
भेटु कशि तुला माऊली विठाई
चंद्रभागेचा तीर मारीतो रे हाक
तोडुन पाश संसाराचे
येत होत्या लेकी तुझ्या
माहेर ची होेते त्यांचे
वाळवंटी पंढरीच्या
तुळशी वृंदावनीची
रूसली सावळ्यारे
टाळ -मृदंग झाले मुके
चिपळ्या ही देवा आता शांत झाल्या
तुझ्या विरहात अश्रृधारा बरसल्या
Comments
Post a Comment