Don' t judge a book by its cover
पूर्वि एकदा शांता बाईंच "पावसा आधिचा पाऊस" हे पुस्तक वाचल होत , त्यात त्यांनि एका चित्रांला बघुन लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असु शकतात याचा छान संदर्भ दिलाय त्याची आठवण राँबिन शर्मा च हे पुस्तक वाचतांना आली.
गम्मत अशि कि मी पुस्तकाच नाव वाचुन ठरवल कि यात काय असेल कि ,हे जग ,यातली नाती स्थाई नाहित तर तु त्यात अडकु नकोस , निर्विकारी हो ,मोह सोड अस बरच .
किंवा
"जण पळभर ंम्हणतिल हाय हाय" या भा.रा.तांबे यांच्या कवितेची आठवण झाली.
मग सहजच पुस्तक चाळायला घेतल तर --------
पुस्तक अगदिच वेगळ ,जीवन मुल्ये शिकवणार ,जीवनात काय? ,कस? ,केव्हा? कराव अस बरच सांगणार .
पहिल्या लेखात ,"Discover your calling "
तुमच्यातल अस बेस्ट शोधा,त्या नुसार मार्गक्रमण करा हे सांगताना ते सांगतात कि त्या साठी तुमच्या हातातला जाँब सोडा अस नाही तर जे तुम्ही करता त्यात बेस्ट करा ,झोकुन द्या. तेव्हाच ते गांधीजींच्या विचाराचा संदर्भ देतात कि ," जो बदल तुम्ही दुसरयात बघु इच्छींता तो आधि स्वत: त करा , जेव्हा हे होईल तेव्हा, तेव्हाच तुमच आयुष्यच बदलुन जाईल."
दुसरया लेखात, "Everyday be kind with stranger "
यात ते म्हणतात सहजच कुणाची तरी मदत करा, कुणाच्या तरी चेहरयावर हसु फुलवा मग बघा तुमचा दिवस किती छान जातो ते?
तुमच्या आजुबाजुची किती लोकं तुमच्या मुऴे आनंदी होतात किंवा तुम्ही त्या आनंदाच निमित्त होता यात मला Who will cry whe you die या शिर्षकाची समर्पकता कळली .
लेखकाचे वडिल ्त्यांना सांगतात कि आपण जन्माला येतो तेव्हा आपण रडत असतो आणि जग आनंदत ,पण अस जग कि जेव्हा तु मरशिल तेव्हा लोक रडतिल आणि तु आनंदात असशिल.
हे या पुस्तकातच वाचल अस नाही पण आपली संस्कृति, विचारवंत , धर्मग्रंथ हेच तर शिकवतात ,नाही का?
तिसरया Maintain your perspective या प्रकरणात ते म्हणतात तुमचा दृष्टीकोन कायम दुसरयाला आनंद देण्याचा ,चांगल तेच बघण्याचा ठेवा. यात त्या साठी ते गोष्ट सांगतात .(ती तुम्ही स्वत: वाचा😉)
तिसरया,"Practice Tough Love "यात तर स्वंय -शिस्त "Self-discipline " याच महत्व ते वाचकाला वेगवेगळे संदर्भ देऊन पटवतात.यात मोठ्या ,महान व्यक्तिंची उदाहरण देऊन ते आपल्या गळी उतरवतात.त्यातल हे पुढे देतेय ,खरतर मी ते वाचुन रेकार्ड केल ,पण येवढी फाईल इथे अपलोड करायला जमली नाही आणि माझ्या शब्दात ते तुमच्या पर्यंत इतक्या प्रभावि पणे पोहचल नसत अस वाटल म्हणून
तर अस हे राँबिन शर्माच परत एक छान पुस्तक कारण तुम्ही पण "The Monk who sold his Ferrari " वाचल असेल आणि "The secret letters" हे पण -----
तर सांगण्याच तातपर्य आतल वाचल्या शिवाय त्यात काय असेल हे सांगता येत नाहि , प्रत्येक बाबतित First impression is the last अस अजिबात म्हणता येत नाहि so is "Don't judge a book by its cover!🙂
Comments
Post a Comment