भुरया
भुरया एक हीरो भुरया खरच भुरया केसांचा ,रंगाने गोरा .तो राजबिंडा आहे दिसायला पण त्याच्या कळपात तो वेगळा म्हणुन त्याच नाव भुरया. रस्त्याच्या बाजुला राहणारया पाट्या- वरवंट्या वाल्या भटक्या जमातीच हे लेकरू. जस रूपवेगळ तच त्याच वागण,विचारही वेगळे.याला शासनाच्या शिक्षणा बाबतच्या धोरणा मुळे शाळेत जायला मिळाल.शाळाबाह्य मुलानां शाळेकडे आणायच म्हणुन शिक्षक त्याच्या आईवडीलांना समजावुन त्याला शाळेत घेउन आले. त्याची शाळा त्याला शिकवायच म्हणुन चालु झाली असली तरी त्याच आणखी एक कारण होत ते म्हणजे त्याला एकवेळ शाळेत जेवायला मिळणार होत शिवाय स्काँलरशीप ही मिळणार होती. भुरया एकदम चुणचुनीत मुलगा,काही दिवसातच त्यान सगळ्यांची मन जिंकली.त्याची निरीक्षण क्षमता उत्तम होती म्हणुनच की काय तो लवकरच फोटोग्राफर झाला .शाळेत कुठल्याही कार्यक्रमाचे फोटो काढायला शिक्षक आपला कँमेरा त्याला देउ लागले. ...