अनोखी अदाकारी


कुठे ऊभेत दोन झाड एकमेकात गुरफटलेल्या प्रेमी युगुला सारखे आलींगन देत.
कुठे तो एकटाच ,निशपर्ण झालेला काळा ,कुळकुळीत मोठासा वृक्ष नटसमराटा सारखा आपल्या लोकांनी अडगळीत टाकलेला.
कुठे भली मोठ्ठी फँमेली पिकनीक ला आल्या सारखी गोलरिंगण करुन बसलीय जनु अस काहीस वाटाव अशी वृक्ष रचना ,दोन तीन मोठे वृक्ष त्यांनच्या मधे छोटि छोटी झाड तर कुठे कुठे ईवली ईवली रोपटी लहान लेकरां सारखी.
कांहीची एटच न्यारी जनु ऐखादी सुदंरी फोटोसाठी पोज देतेय,तर ऐखादी अंगडाई घेतेय.
ऐरवी काँमन वाटनारया कडुलिंबालाही वेगळच रुप आलय ,वर वर आलेल्या कोवळ्या पांनाचा रंग काही वेगळाच.
खर तर त्याला शब्दात अन फोटोत कैदच करता ऐत नाही असा तो आहे या सृष्टी रचयत्या च्या ड्रामा मधला अनोखा अदाकार.
Comments
Post a Comment