सहज सहयोग

                            सहज सहयोग

पर्वा सोमवार ,1तारीख त्यामुळे बँकेत बरीच गर्दी होती.पेन्शन घेणारे,पगारदार,श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी,बचतगट या सर्वांचीच गर्दी.
प्रत्येक काऊंटर वर लांबच लांब रांग.यातच शिकलेल्या लोकां बरोबर अगदी अंगठा बहाद्दर म्हणजे काही खरोखीच अशिक्षीत तर काही व्यवहार ध्यान नसलेले.मज्जा ऐत होती निरीक्षण करन्यात.काही हसरे चेहरे.काही काळजीत पडलेेले,काही गोंधळलेले काही निर्विकारी.अश्यातच ऐका काऊंटर वर ऐक स्लीप घेउन ऐक तिशीतली बाई ॆआली व अंगठा द्यायचाय म्हटली ,पलीकडच्या बाईनी किती पैसे काढायचे ?अस विचारल आणि हवी ती खात्री पटल्यावर त्यांनी स्टँम्पपँड पुढे केल त्या बाईंनी अंगठा लावला व पुढच्या कांउटरवर गेल्या.
नंतर बँकेच्या साहेबांच्या केबीन बाहेर त्या बाई आणखी दोघीं सोबत दिसल्या. आत जान्याचा प्रयत्न करणारया त्याना साहेबांनी हातानेच थांबवल.नंतर  साहेबांनी आत बोलवुन विचारले काय काम आहे? तर त्यांनी तीच स्लीप दाखवली व त्यावर त्यांची सही हवीय.त्यांनी ती स्लीप बघीतली व त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला .
खरतर नवीन नियमानुसार विस हजारावरील रक्कम काढन्या साठी चेक लागतो पण त्या चेकबूक वापरत नसाव्यात.
यावर सरांनी त्यानां शांन्तपणे पर्याय सुचवला की आज तुम्ही ऐकोणवीस हजार आणि काही उद्या काढा. मग विचारल की स्लीप दुसरी भरावी लागेल का ?  त्यानीं हो म्हटल आणि आधीची स्लीप निट फाडुन टाकायला सांगीतलं
त्या तीघी हसरया ,समाधानी चेहरयाने परतल्या.
खरच हेच त्यांना आधीच कुणी समजऊन  सांगीतल असत तर त्यांचा वेळ वाचला असता ,मनस्ताप वाचला असता.
अगदी छोटीशी गोष्ट असते पण ती करण्याची आपली भावना,ईच्छा हवी आणि ती जेव्हा मोठी माणस करतात तेव्हा तो सहजच केलेला सहयोग  लोकांना मोठीच मदत करतो.
मग हे साधि गोष्ट सहज समजवुन सांगने असो की ऐखाद्या  जेष्ट नागरीका साठी पुढेहोऊन पटकन शटर उचलन .
अशी माणस आपल्या कृतीतुन वागनुकीची शिकवण सहजच देवुन जातात.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल