त्यांच पालकत्व
हेही आई बाबा
आज सकाळी अनेक पक्षांचा गलका ऐकु येत होता,बराच वेळ ,झाला तरी थांबायच नाव नाही,एरवी कानाला गोड वाटनारी त्यांची किलबील वेगळीच वाटत होती.
मग न राहून आले बाहेर, तर मनीम्याँव दबा धरुन बसली होती,तिचा एकंदरीत पवीत्रा बघता तिला तिची शिकार समोर दीसली होती आणि त्या शिकारयाच्या भीतीने समस्त पक्षी फँमीलीज आर्त होऊन मदती साठी पुकारा करत होत्या.
मनी ला हूसकाऊन लावल तर ,थोडी शांतता झाली.
पण मी तिच्या शिकारी वृत्तीला ओळखुन होते कारण या आधीही तीच्या तोंडात पक्षी पाहीलेत ,बागेत अनेक दा पण तेव्हा त्यानां वाचवन शक्य झाल नाही ,आज मात्र मी त्या खाली पडलेल्या पिलाला वाचवल.
त्याला अजुन उंच उडता एत नव्हत, म्हणुन मी त्याला उचलुन मला सेफ वाटल त्या जागी ठेवल.
तर महाशय खाली हजर.पण आता त्चाची जागा बदललेली होती.पण त्याच्या आई बाबांना अजुन ते सापडल नव्हत.ती दोघही त्याला पुर्वीच्या जागी शोधत होती, तो आर्त स्वर ,ते तिच सैरभैर होण मनाला अस्वस्थ करत होत .
आता मला काम असल्यामुळे मी आत निघुन गेले .त्याची व त्यांची ही काळजी वाटत होती.
थोड्या वेळाने हे सागायला लागले की ते पिल्लु एका फर्षीच्या माघे आहे आणि ते पक्षी तिथेच त्याला भरवताहेत.
मग मन शांत झाल .
कस शोधल असेल त्यांनी एकमेकाना?
असो पण आता नव्या जागेत त्यांचा संसार चालु झाला.ते पिल्लु आई बाबांच्या निगराणीत वाढत होत. ते दोघ आळीपाळीने त्याच्या आसपास वावरत होती.आई त्याला तीथे फर्षीच्या मागे जाऊन भरवत होती.
तर आहे की नाही हे ही पँरेटींग त्यांच पालकत्व.
Comments
Post a Comment