Thank you आई बाबा
Thank you आई बाबा
आज काही Thanks giving day नाहीय. मग तुम्ही म्हणाल मग हे थँक यु कशा साठी?
खर तर आपण जन्माला आल्या पासुन किंवा त्याही आधी पासुन आई बाबा आपल्या साठी काही ना काही करतच असतात.त्यांच्या दैनदीन आयुश्यात बाळा साठी म्हणुन आधीच बरीच तडजोड ,जुळवाजुळव चालु असते.
लहानपणी त्यांच्या सावलीत आपली वाढ होत असते ,तेव्हा एखाद्या नाजुक झाडाला जसे प्रखर उन सोसवनारे नसते अगदी तसेच आपल्यालाही प्रत्यक्ष जीवनातील संघर्ष सोसनवनारा नसतो.
पण हळुहळु ते आपल्याला बाह्य जगासाठी तयार करायला लागतात.त्याचाच भाग म्हणुन कधी त्याची शीस्त असते,कधी कधी आपल्या नकोत्या हट्टांना नकार असतो.
या सगळ्यात त्यांच आयुश्य आपल्या अवतीभवती च असत .
आईच आपल्या साठी तिच्या वैयक्तीक बाबी कडे दुर्लक्ष होत,जणु ती फक्त आई च होउन राहते तर बाबांच प्लानींग आपल्या शिक्षणा पासुन तर लग्णा पर्यंतच.त्या साठी जीवाच रान करत असतो बाबा.
मग आपण एक स्वतंत्र झाड होउपाहतो त्यात मधे मधे ऐणारया वादळात परत आपल्याला त्यांच्या आधाराची गरज असते आणि ते असतातच आपल्या साठी.
खरच म्हणतात ना," घाबरु नको मी तुझ्या पाठीशी आहे."
काहीस असच असत त्यांच .वय वाढत ,शरीर अनेक दुखनी काढत असत,मन ही हळव होत.
हातातल बरच काही सुटत असत ,हळुहळु विरक्त व्हायच असत ,आयुश्याच्या संध्याकाळी थकलेल्या जीवाला शांत ,समाधानी,निवांत जगायच असत.
अशावेळी आपल्या आयुष्यात अचानक ऐखाद संकट ओढवत अन या वेळी ते परत नव्या ताकदीनिशी आपल्या माघे उभे राहतात ,आपल्याला सावरतात.
आपल्या नी्र्णनयात आपल्या सुखाचा वीचार करुन ते साथ देतात.बरयाचदा त्या साठी कनव्हेंन्स करायला वेळ लागतो पण आई बाबा तयार होतात.
म्हणुन आई बाबा thank you so much .खर हे खुप छोटस आहे पण व्यक्त करायला हेच सुचल.
Comments
Post a Comment