भुरया

                             भुरया एक हीरो
           भुरया खरच भुरया केसांचा ,रंगाने गोरा .तो राजबिंडा आहे दिसायला पण त्याच्या कळपात तो वेगळा म्हणुन त्याच नाव भुरया. रस्त्याच्या बाजुला राहणारया पाट्या- वरवंट्या वाल्या भटक्या जमातीच हे लेकरू.
      जस रूपवेगळ तच त्याच वागण,विचारही वेगळे.याला शासनाच्या शिक्षणा बाबतच्या धोरणा मुळे शाळेत जायला मिळाल.शाळाबाह्य मुलानां शाळेकडे आणायच म्हणुन शिक्षक त्याच्या आईवडीलांना समजावुन त्याला शाळेत घेउन आले.
     त्याची शाळा त्याला शिकवायच म्हणुन चालु झाली असली तरी त्याच आणखी एक कारण होत ते म्हणजे त्याला एकवेळ शाळेत जेवायला मिळणार होत शिवाय स्काँलरशीप ही मिळणार होती.
       भुरया एकदम चुणचुनीत मुलगा,काही दिवसातच त्यान सगळ्यांची मन जिंकली.त्याची निरीक्षण क्षमता उत्तम होती म्हणुनच की काय तो लवकरच फोटोग्राफर झाला .शाळेत कुठल्याही कार्यक्रमाचे फोटो काढायला शिक्षक आपला कँमेरा त्याला देउ लागले.
       शाळेत येणारया पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जायला लागली.पाहुण्यांना एखादी कवीता म्हणुन दाखवण अगदी इंग्रजी कवीता सुध्दा तो उत्तम  म्हणायला लागला.आभाराचे Thank you ही भुरया म्हणायचा.
   एकदा आलेल्या पाहुण्यांनी त्याला विचारले त्याला काय व्हायचे आहे? तो म्हणाला मला  पोलीस व्हायचे आहे.
   तर हा लहानगा पोलीस एकदा नदिवर आंघोळीला गेला तीथे काही बायका धुण धुवत होत्या व त्यांची लहान मुल बाजुला खेळत होती ,त्यातला एक खेळता खेळता पाण्यात गेला ,आईच लक्ष कामात होत ,तो मुलगा खोल पाण्यात गेला अन पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत गेला.
     ईकडे मुल आरडाओरडा करायला लागली ,पण आपला भुरया त्याच्या माघे गेला लगेच अन त्याला पकडुन काठावर आणल .
   त्याच्या या प्रसंगावधान तेन त्या मुलाचे प्राण वाचले.
त्याची आई आपल्या लेकराला जवळ घेउन पटापटा त्याचे मुके घेत होती.तीच्या साठी भुरया खराखुरा हिरो होता.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल