पिल्ल सोनुली .
खरतर त्याच्यां घरट्यात फक्त आईच येते पण माझ्या त्यांना बघन्याच्या ओढीने मी त्यांच्या घरट्याच्या अगदी जवळ गेली आणि हा नजारा पाहीला.खरतर आई सोबत त्यांचा फोटो मला काढायचा होता पण त्या बुलबुल ला अजुन माझी भीतीच वाटते कदाचीत ,पण मी तीचा विश्वास नक्की जींकेल एक दिवस कारण अशीच एक चुटुकली काळी चिमणी अगदी माझ्या जवळ बसत असते ,कधी एकाच पायावर साधना चालु असते तीची. पण तीच घरट मात्र वर बनवलय तीन.
कधीकधी वाटत आपण ते आपल्या जगात आलेत की आपण त्यांच्या .
ही आपली वा त्यांची अशी करता येईल का? कारण त्यां च्या आपल्या आजूबाजुला असन्याने जीवंत पणाचा अनुभव येतो त्यांचा चिवचीवाट,केकीळेच कुहुकुहु,पोपटांचा आवाज कस वेगळ पण मधुर संगीत.त्यांचे रंग ,त्यांच उंचच उंच उडन.हे सगळ आपल्याला नव्याचा शोध घ्यायला प्रेरीत करत.अन ईवल्याश्या चोचीने त्यांनच घरट बनवन,त्यांच्या पिल्लांच संगोपन हेही आपल्या आळशी जीवांना शीकवण देणारच आहे की.
म्हणुन बहीनाईच्या कवितेत सुगरन आपल कौतुक करुन घेतेय.
Comments
Post a Comment