आम्ही उद्योगीनी

                         आम्ही उद्योगीनी

चाळीशीतल्या पाच सहा बायका भली मोठ्ठी गाठोडी घेउन गाडीत चढल्या.गाडी सुरु होताच त्या मोठ्या गाठोड्याच्या उतरंडीतुन एक एक गाठोड काढुन सीट खाली ठेवत होत्या.
मी जरा खाली वाकुन पाहत होते तर म्हटली चप्पल बाजुला ठेवलीय.
त्या सगळ्याच दारा जवळ बसल्या होत्या .थोड्या वेळात सगळ्या आपल्या शिदोरया काढुन  जेवाय ला बसल्या.हसत 
खीदळत आहे ते वाटुन खात होत्या.
हे सगळ दारा जवळच्या सीटवर बसल्या मुळे दिसत होत.माझ निरीक्षण चालुच होत .
थोड्या वेळात एकीला फोन आला ती हसत लाजत बोलत होती,मला ती काय बोलतेय ते  ऐकु येत नव्हत पण कदाचीत तीला तस वाटत असाव कारण ती बोलता बोलता माझ्या कडे बघत होती.
पुढच्या स्टेशन ला दोघांनी केळीच्या पानाचे गठ्ठे आणले,ते देतान्ना त्याने तीला पुढची आँर्डर असली तर कळव अस सांगीतल.
ती परत सीट खाली काही तरी करत होती मी आपल सहज विचारल ,"उतरायचय का?" तर ती म्हणाली ,"नाही ताई ,आत्ता डायरेक्ट कल्याण "
मला आश्चर्यच वाटल कल्याण ला त्या बेलाची पान आणि केळीची पान नेत होत्या बुह्राणपुर ते कल्याण ,बराच लांबचा पल्ला .
हा व्यवसाय त्या गटा ने करत असाव्यात कारण इतर ही डब्यात अशा बरयाच बायका होत्या.
असो तर या उघ्योगीनी आत्मविश्वासाने हा उद्योग करत होत्या व त्याच्या डोळ्यात  ली चमक मला जणु सांगत होती "आम्ही उद्योगीनी"

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल