हमारी आशा
हमारी आशा
"ताई मी उद्या जरा लवकर येइल" आशा बाई भांड्याची पाटी
ठेवता ठेवता सांगुन गेली.
माझ्या कडे धुनीभांडी करणारी आशा ,हसरी आणि संतुष्ट वाटनारी.
ऎकदा तीच्या ऐवजी मावशी आल्या म्हणजे तीची आई ,मी सहजच विचारल ,आज आशाबाई नाही आल्या ?
मावशी म्हणाल्या ,"ती अआजारी आहे .दवाखान्यात जायच नाही म्हणते ताई.काय व्हायच ते होऊदे"
अस का म्हणत असेल म्हणत असेल असा विचार मनात आला तोवर मावशी पुढे म्हणाल्या ताई ,जशी माघारी परत आलीय तशी खाली मान घालुन काम करते,कुणाशी बोलन नाही,कुठे जान नाही.
सासरच्यानी तीला सोडुन दिलय .
हे ऐकुन जरा धक्काच बसला.नाही म्हणजे ही काही नवीन घटना नाहीय,अस आजुबाजुला चालुच असत पण आशाबाईच्या बाबतीत एकुन आश्चर्य वाटल कारण गेले सहा महीने काम करतानां कधीच ती नाराज,निराश दिसली नाही.
आपल काम भल आणि घर भल.
खरच एरवी नवरयान टाकलेली बाई म्हणजे दु:खी चेहरा ,उदास अस काहीस चित्र असत.पण आशाबाई याला अपवाद आहे .ती धुनीभांडी करते,मंगल कार्यालयात कामाला जाते,शेतीतली कामही करते.
यातुन मिळनारा पैसा बँकेत ठेवते वर लहान लग्न झालेल्या बहीणींचे ,त्यांनच्या लेकरांचे लाडही करते.
अशी आहे हमारी आशा 😌
Comments
Post a Comment