मारीया एक बेट
मारीया
आज कपाट आवरतांना एक पिशवी सापडली.तुम्ही म्हणाल काय खास आहे त्या पिशवीत?
हो खासच आहे ती कारण ती मारीया आईने शीवली आहे जि दोन्ही पायांनी अपंग आहे शिवाय दोंन्ही डोळ्यांनी अंध.
एवढच नाही तर ती राहते एका अनाथ आश्रमात.
तर मारीया मला भेटली ती औरंगाबादच्या मदर टेरेसा आश्रमात ,जिथे अंध -अपंग,निराधार,वृध्द,मानसिक वृग्ण अशे सगळे पिडीत एकत्र राहतात एका परिवारा सारखे.
मी मधे मधे तिथे जायचे,थकलेल्या मनाला नवी उभारी मिळायची .ती सगळी इतकी दु:ख , अडचनी असुनही आंनदात राहायची .त्यांना भेटलकी खुप प्रेम मिळायच .त्याना माझ्या कडुन फारस काही मिळायच नाही फक्त मी त्यांना भेटायला आलेय यातच भारी वाटायच कारण त्यांचे नातेवाईक त्याना भेटायला यायचे नाहीत आणि माझ्यात कुणाला लेक दिसायची,कुणाला बहीण तर कुणाला आई छोटे छोटे हट्ट करायला.
मारीया याच्यांत जास्त जुनी मेंबर कारण ती घरच्यां सोबत राहायची तेव्हा पासुन तीला या आश्रमातील सिस्टर्स कधी शीवण शिवायला शीकवत तर कधी वस्तीवर औषोधोपचार द्यायला येत आणि तिची आई गेली ,बहीणीच लग्न झाल तशी मारीया इथली झाली.
तीला बाहेरुन आलेल्या लोकांशी बोलायला लावत ,तीला प्रार्थना छान म्हणता यायची .ती दुवा द्यायची तीच्या वेगळ्या शैलीत म्हणजे कुणी एखाद्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ जेवण दिल तर त्या आत्म्या च्या शांती साठी,मुक्ती साठी ती दुवा तर वाढदिवसाला त्याच्या उज्वल भविष्या साठी दुवा.
अस म्हणायचे तीच्या प्रार्थनेत खुप शक्ती आहे .ती फार प्रेमळ आणि खंबीरही होती म्हणजे कुणी उदास असल तर त्याला प्रेमान गोंजारायची तर कुणाच भांडन झाल,एखादी म्हातारी औषध घेत नाही तर मरी आई च ते सहज करून टाके.
मरीआई म्हणजे मारीयाच ,तीथे मराठी भाषीक बरीच मंडळी होती त्यांना मरीआई जास्त जवळची वाटे.
असच तीच आणि माझ जवळच नात पण त्याला नाव नव्हत अस स्पेशल काही.मी सागींतलेल्या दिवशी नाही गेले तर ती काळजीत पडत असे आणि एखादा समजुन घेणारा वीजीटर आला तर त्याच्या फोनवरुन मला फोन करी.
कधी तीला दिलेल काही विशेष गिफ्ट माझ्या साठी ठेवे.तर चाँकलेट्स माझ्या लहान मुला साठी. अस आमच मधुन मधुन भेटन चालु होत अश्यातच मी दुसरया गावाला शिफ्ट होणार म्हटल्यावर तीने माझ्या साठी पिशवी शिवली ,डोळ्यांनी दीसत नसतांना तीने सुरेख पिशवी अगदी आत पैसे ठेवायला छोटा कप्पा,वर चैन ,गळ्यात अडकवायला बंद ,शोभेची बटन अस सगळ.
मी तीला यायच्या आधी भेटायला गेले तेव्हा तीने मला ती पिशवी दिली म्हणाली भाजी घ्यायला जाशिल तेव्हा वापर माझी आठवन म्हणुन .ती पिशवी प्रेमाने ओतप्रोत भरलेली.
मारीया नावाच्या या बेटावर अनेक मन विसावतात, प्रेमाच्या सावलीत, मायेच्या पदराखाली.
Comments
Post a Comment