पुस्तक मैत्री
पानो पानी चे लेख जागविती किती किती रात्री
मर्ढेकरांच्या काव्य पंक्ति
कुसुमाग्रजांची शैली ओघवती
वि.दा.ची कविता बोलकी
आरती प्रभु ,सुरेश भट ,विठ्ठल वाघ
शांता बाई ,पु.ल.आणि किती किती नावे घ्यावी
प्रत्येकाचा बाज वेगळा ,
महाराष्ट्राच्या या हिरयांचा हा साज वेगळा
मन कवडे कवि हे सारे ,जाणति भावनांची स्थित्यंतरे
त्या कथा अन कादंबरया
मानवी जीवनपट उलगडे
शब्द फुलांची गुंफण सारी
स्वप्नांचे ते उंच मनोरे
खुजी वाटती क्षीतिजे अन संह्याद्रीचे उंच कडे
या सारया कवि कल्पनांन पुढे
कधि आणिती अश्रु नयनी
कधि फुलविती आनंद मळे
साहित्याचे जग वेगळे
हात धरता या मित्राचा
पळुन जाती निराशेचे ढग ते सगळे
Comments
Post a Comment