निसर्ग सखा
नाद आहे मज रान फुलांचा
खुनाविती ते हिरवे डोंगर
सळसळत्या वृक्षांची पाने
गाती मज कानात गाणे
संथ वाहती शुभ्र नद्या त्या
साद घालीती मज ह्रदया
निवांत सांज अन मावळतिचा सुर्य नजारा
भुलवितो शहरातिल झगमगाट सारा
सुर्योदय रोजच फुलवितो
नव आशेचा मोर पिसारा
Comments
Post a Comment