आजच्या आईचे मनोगत
शिक्षण आणि संस्कारातले
काय आणि कसे द्यावे मुलांना
मज न कळे ,मज न कळे,मज न कळे
मी आई या युगातली
मज पुढे हे प्रश्न किती?
संध्येची शुभंम करोती विसरली हि पिढी
काय देश प्रेम अन संस्कृतिची जोपासना
भरकटलेल्या या मनांनचा थांग काही कळेना
सतत आपले इंग्रजाळलेले भाव अन आवडी
नको पोहे हवा पित्झा,नको कविता रॅप हवा
देशी कापड ही त्यांना फँब इंडियातला हवा
मौज कसली त्यांना वाटे ,फिरवीती फक्त मोबाईलवर बोटे
कुठे चाललो ,कुठे हरवलो हे त्यांना ना काही कळते
काही म्हणती ,"मुले देवाघरची फुले"
काही म्हणती ओल्या मातीचे ते गोळे
उमलु द्यावी त्या परी की?
ठोकुन आकार द्यावा
काय करावे मज काही काही कळेना
आता या लेकरां साठी रिती करावी कुठली ओंजळ
मज काही ही कळेना!
Comments
Post a Comment