पाऊस वैरी
वाहून गेली सारी आशा
वाहून गेला आता भरवसा
येतो सांगा पाऊस हा कसा ?
कधि कोरड्या ठक्क विहिरी
कोमेजलेली पिके हिरवी
रानोमाळी भटकंती करिती
गुरे बिचारी पाण्याच्या त्या थेंबा साठी
डोळे लावतो आभाळा कडे
तुझ्या येण्याचा भास कुठे तरी
मग अचानक फाडून येतो आभाळच सारे
गाडून टाकतो , उमललेले स्वप्न पसारे
वाड्या वस्त्या उजाडून सारया
वाहतच राहतो ,बरसतच राहतो
अश्रू देवून डोळ्यातूनही
प्रलयाचा आभास करवतो
आस लावतो तुझ्या येण्याने
रूजण्याची रे ,फुलण्याची रे
मग तू का येतोस असा?
वैरी म्हणून ,
संपवून जातो सार सार -----
Comments
Post a Comment