शोध इथे संपतो फक्त तो घ्यावा लागेल
आत्ताच टोकियो आँलंपिक झाल , नंतर ज्यांना पदकं मिळाली त्यांच कौतुक व ज्यांना त्यात अपयश आल त्यांना बसल्या जागेवर शिकवण व भारत कसा या बाबतित अपयशी ठरतो ,आपल्या देशात खेळा साठी काहीच करत नाहीत इत्यादी दुशन.
चायना आपला शेजारी आणि म्हटल तर प्रतिस्पर्धी सगळ्याच बाबतित. तर हा देश कुठल्या प्रकारची स्पर्धा आणि कुठल्या लेव्हलची स्पर्धा करतो ,कुठल्या इर्षे पोटी आणि त्या साठी इतर व त्याच देशाचे नागरिक काय काय भोगतात हे सामान्य ,बापुड्या व ठराविकच बातम्या बघणारया लोकांना कुठे माहिती आहे नाहि का ?
आत्ता काहि पत्रकार जसे आपल्या देशाची काळी बाजु जाणतात ति जगा समोर आणतात तसच काहिस चीन च्या बाबतितही आहेच कि. कितीही लपवल तरी जस वुहान च वास्तव समोर आल तसच चीनच खेळातल्या या यशा मागच रहस्य काहि अभ्यासक व पत्रकारांच्या पाठपुराव्याने समोर आल शिवाय सगळ्यांच्याच हातात असलेला हा मोबाइल पण बरीच स्टिंग आँपरेशन्स करत असतोच की.
सगळ्यांनीच वाचलय की नाही माहीत नाही पण चीन पहिल्या आँलंपिक मधे फार काही करू शकला नव्हता ,काहि आँलंपिक मधे तर सहभागि व्हायला खेळाडूच नव्हते तेव्हा चीनच्या तेव्हाच्या शासन कर्त्यांनी विशीष्ट खेळासाठी आवश्यक असणारया शारिरिक वैशिष्ट्य असणारया मुलांचा शोध घेऊन त्याच खेळात त्यांना पांरगत करायच व अगदि लहान वयातच शालेय स्थरावर विविध स्पर्धा घेऊन त्यातुन निपुण खेळाडु निवडायचे व त्यांना एकच ध्येय द्यायच "जिंकायच!" .
ज्यांना यश मिळाल ते' चमकते सितारे ' पण ज्यांना ते मिळवता आल नाहि त्यांना जीवनात इतर काहि कैशल्ये वा शैक्षणीक पत्रतेच्या आभावाने जगणे अवघड झाले.
आत्ताच्या स्पर्धां मधेही जे हरले त्यांना मायदेशी जायची भिती वाटत होती.
खेळ जिथे संघ भावना ,अदान प्रदान ,स्विकार जिद्द,दुसरयाच कौतुक करायला शिकवतो तिथे हे काय ?
तर असो ,आपण भारतिय अल्प संतुष्ट आहोत आपल्या साठी आँलंपिक पुढच्या चार वर्षांनिच परत येईल .
खेळाडू व त्याच्याशी निगडित यंत्रणा कामाला लागलि असेल ते वेगळ .
पण आपणही काहि नैसर्गिक गुण वा शारिरिक क्षमतां चा अभ्यास करून हे केले तर आपल्या आदिवासी बांधवां मधुन पदक विजेते सापडू शकतात ,तसा प्रयत्न काहि प्रशिक्षकांनि केलाय पि.टी.उषाचे गुरू किंवा आपली सावरपाडा एक्सप्रेस म्हटली जाणारी कविता राऊत हि याची मोजकि उदाहरण .
ईशान्ये कडील राज्यां मधे खेळ संस्कार रूजलेयत आणि बरेच खेळ सतत खेळलेही जातात मग ते पारंपारिक असोत किंवा इतर ,नेहमीच्या स्पर्धा या मुळे मुलांचा कल त्या कडे असतो व बरेज पारखी त्यातुन हिरे शोधुन काढतात .
आपल्या कडे म्हणजे महाराष्ट्रात संध्याकाळी व्यायाम म्हणून खेळ जास्त असावा पॅशन म्हणून फार कमी. त्यात सगळ हातात मिळणारया म्हणजे 'गोल्डन स्पुन इन माऊथ ' या मुलांना फँशन म्हणुन खेळवल जात ज्यांना मेहनत करायची नसते व कष्टांची ,सहन करायची, मेहनत घ्यायची सवय नसते तिथे हवे ते परिणाम दिसत नाही.
हे सगळ बघता वरच्या फोटोतला स्पाडर मँन बघुन वाटल ,लहानपणा पासून रानात अनवाणी भटकणारी , झाडं, डोंगर दरयांवर लिलया चढणारी ,भरपुर रान मेवा खाणारी ही जन्मताच संघर्ष करायला सरावलेली मुल योग्य मार्ग दर्शन मिळाल तर काय नाहि करू शकत?
फक्त पारखी नजर हवी व पैलू पाडणारे कुशल कारागिर(प्रशिक्षक) मग आपल्या देशातल्या प्रकशझोतात न आलेल्या या खाणीत ही आपल्याला अनेक हिरे गवसतिल.
Comments
Post a Comment