चांदण्यांच झाड


       क्षितीजावर उभे तरू हे

         देई साक्ष मिलनाची

 धरणी हिरवी अन ढगाळ अंबर

बरसण्या आतुर ,ओथंबले ढग

 तृप्त चराचर , तृप्त तरूवर

हा आगळा , न शाल हिरवी पांघरली

न दाटी फांद्याची झाली

 नक्षी नवी चांदण्यांची लेवून 

सजले जणू पोर्णिमेला अंबर

   आकाशीचे तारे संभार ,या तरूचा अंगावर 

झाले हे चांदण्यांचे झाड


Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल