मस्ति की नई पाटशाला
हि चिमण्यांची नवी टिम सध्या बागेत चिवचिव करतेय.
या पिटुकल्या दिवसभरात चार पाच दा तरी येतात ,प्रत्येक वेळी विचारून ,"काकू आम्ही खेळू का बागेत?"
कधि कधि हातातल काम सोडून त्यांच्या बोलवण्यावर दारा पर्यंत जाण्याच जरा जीवावरच येत.
पण खर पाहता तो कधी सहजच लटकवलेला झोका इतक्या निरागस चेहरयांवर हसु फुलवतो आणि विशेष म्हणजे या मुलिंना काहि तास का होईना मोबाईल पासुन ,टि.व्हि.पासुन दुर ठेवण्यात यशस्वि होतो याचा जास्त आनंद व समाधानही वाटत.
मग फावल्या वेळात मी हि त्यांच निरीक्षण करत त्यांच्यात चाललेल्या निरागस संवादाचा आणि खेळाचा मनसोक्त पण लपून आनंद घेते.
मी त्यांच्या कडे बघतेय अस जाणवल की त्या थांबून जातात आणि मलाही त्यांच्या खेळात व्यत्यय आणल्याच वाईट वाटत.
आज सहजच यांनी (आमचे हे) सोमनाथ परबांच " नदिला आला पुर,पुराला पायरया शंभर ,आनंदा येई बहार," अस काही तरी बालगीत लावल तर त्या मजेत नाचायला लागल्या.
आणि या फिंद्र्या( हे यांनी माझ्या बाल मैत्रिणींना दिलेल विशेष नाव) एक चैतन्य देऊन ,दुपारच्या वामकुक्षीला घरी उडाल्या .
आत्ता शाळा प्रत्यक्षात सुरू होई पर्यंत तरी हि " मस्ति की पाटशाला रोजच भरत राहणार हे नक्की.
Comments
Post a Comment