Posts

Showing posts from 2020

बोचरा प्रश्न

Image
          सगळी कडे दिवाळीची धुम चालू होती ,दुकाने रस्ते माणसांच्या गर्दीने फुलले होते.    जागो जागी  दिवाळीसाठीच्या वस्तूचीं दुकाने सजली होती.करोना असला तरी आपण तो विसरून दिवाळी साजरी करण्यात त्याच्या भितीला भीक घातली नाही.     रोशनाई ,आकर्षक दिवे,आकाश कंदिल ,कपडे ,फराळ ,वाहन इतकच काय पण सोने चांदी खरेदी करणारे पण भरपूर आहेत , दुकानं आणि रस्त्या वरची गर्दी याची साक्ष देत होती.    या सगळ्यात मी ही दिवाळी साठीचा किराणा (जो एरवी पेक्षा जरा जास्तच होता  ) ,पणत्या ,काहीं मला वर्षभर मदत करणारयां लोकां साठी मिठाई (कामवाली,कचरेवाला,दुधवाला,अमावस्वया मागणारी बाई,गुरखा ,पोस्टमन) व इतर सामान ज्या मुळे माझी ट्राली गच्च भरली होती, तसेच बरयाच जणांचे सामान भरपूरच होते.                त्यात एक सत्तरी चे आजोबा ,पांढर धोतर ,पिळदार मिश्या,अंगाने धिप्पाड असे जणू कष्टाने कमावलेली शरिरयष्टी.     आजोबांच्या  बास्केट मधे  मोजून तिन/चार वस्तू तेलाची कॅन ,साखर ,मुरमुरयाच पॅकेट,शेंगदाणे ,डा...

आनंदाच दान (Smile 😊please)

Image
   आज सगळी कडे चिंतेच वातावरण आहे, कुठे मरणाची भिती तर कुठे नोकरी -धंदा गमावण्याची, तर कुठे आपल्या माणसानां गमावण्याच दु:ख.     हे सगळ जरी असल तरी निरागस मन ,कुठल्याही काळजी शिवाय जगणार बालपण एक आनंदाची ,हास्याची लकीर आपसूकच ओठावर घेऊन येत. न कसली चिंता न फिकीर .पोट भरल, झोप झाली की बास ही आपली हसतच असतात वर ती थोडही रडली की आपण त्यानां हसवण्या साठी काय ? काय ? करतो.  पण लहान मुल कसही असल अगदी बाळकृष्णा सारख लोभस किंवा शेंबड कळकट तरी त्याच्या निरागस चेहरया कडे बघून आपले ओठ हास्य लकीरी साठी जरा लांब होतातच. किती लोभस असत ना हे  हसू .विशेषत: मुलांच्या बाबतीत. त्यात कुठलाही देखावा ,वरवरच ,नाटकी अस काही नसत. खरतर अनोळखी मुल ही,  आपण रस्त्याने जाताना त्यांच्या कडे बघुन नुसती भुवई उंचावून  काय ? अस इशारयाने विचारल तरी काही लाजून तर काही बिंधात स्माईल 😊 देतात. अस मोठ्याच्यां बाबतीत नाही होत, ते आपल्या ओळख दाखवण्याचे तर्क काढत बसतात .  पण यातही खेड्यात शेतात जाणारया बायका पटकन स्माईल देतात हा माझा अनुभव आहे. असो ,तर एखादयाच्या गालावर  हास्य फुल...

डॅशिगं लेडी

Image
आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक व्यक्ति भेटतात पण काहिच आपल्या कायम स्मरणात राहतात.का येवढ्या गर्दित काहिच लक्षात राहत असतील?" काय असत त्यांच्यात ?"somthing special" होच ----         तर अशिच ही स्पेशल ,तुम्हि म्हणाल काय येवढ तिच्यात ? मी तिलाच डॅशिगं अस संबोधलय.  आज हि एका ग्रृप मध्ये होती ज्या "जनधनच "खात उघडायला आल्या होत्या ,चारपाच बायका असतिल .मस्त आपला नंबर येण्याची वाट बघत झाडा खाली बसल्या होत्या .हसण चालू होत.गप्पा चालू होत्या त्यांच्या भाषेत , वंजारी बोली आहे त्यांची,लोंणज त्यांच गाव.     "आधार कार्ड",  "मतदान कार्ड " यांची जमवा जमव चालू होती. यातली एक गटप्रमुखाच्या रोल मधे.शिकलेली एकही नाही पण आत्मविश्वास शिकलेल्यानां लाजवेल असा.          लाॅकडाऊन मध्ये काहीनां दर महिन्याला 500 रू.  जाहीर केलेय सरकारनी आणि तिच मिळवण्या साठी या आल्या होत्या.      त्यांच एकंदरीत काय चालूय हे बघतानां मजा वाटत होती.त्यांच्या बेफीकीर वृत्तीची ,बिनधास्तपणाची म्हणजे पैसा कमी असेल किंवा लाॅकडाऊन मुळे नसेलही काहीं जवळ ...

तुज सगुण म्हणू कि निर्गुण रे

Image
  प्रश्न असा आहे कि विद्वानातला विद्वान उत्तर देऊ शकणार नाही ,अथवा कुणीही सामान्य माणूस उत्तर देऊन टाकेल कि तो सगुणच आहे ,त्याचे हे गुण दिसतातच की आपल्याला सृष्टीच्या चराचरात,तोच तर सुर्याला आपल्या साठी लाली देऊन नवी प्रभा आणतो,  पानांफुलांत कित्ती कित्ती रंग भरतो.प्रत्येकाचे वेगळे रूप ,वेगळे गुण .त्याला कित्ती वेळ लागला असेल हे सगळ निर्माण करायला ,म्हणजे विद्न्यान वादी लोकांन च्या दृष्टीने हे निरर्थक असेल ,त्याचे वेगळे विद्न्यान असेलही पण या निर्मीतीत अस काही आहे जे मानवाच्या (आत्ताही)अवाक्या पलिकडचे आहे.त्या जगनिर्मात्या ,सृष्टीकर्त्या परमेश्वराच्या रचनेत पंचतत्वां चे विशिष्ट स्थान आहे ,त्यात जल ,पाणी ,नीर हे आपना सर्व सजीवांचे जीवन आहे ,त्याचे ही चक्र वेगळे ,पाऊस, नद्या ,झरे ,धबधबे ,समुद्र ठाई ठाई माणसाने नतमस्तक व्हावे अशी निर्मिती.त्याच्या निर्मितीतल्या प्रत्येकाचे वर्णन करणे केवळ अशक्य.ते चित्रकाराच्या चित्रात बंदिस्त होत नाही कि कविच्या कवितेत . आकाशातले रंग वेगळे रंग धरणिचे वेगळे,गर्द हिरव्या वनराईचे ,अन पानोपानी रांगोळीचे,रंग पाण्याच्या तुशारांचे,रंग झरयाच्या पावित्र्...

या जलधारा

Image
या जलधारा लावीती वेड मनाला!, खरच आहे ना? ज्यानां पावसाळा खुप आवडतो ते सगळेच माझ्याशी सहमत असणार,हो की नाही?"पावसाळा नेमेची येतो" अस म्हणत  असलो तरी प्रत्येक वेळी तो नव्याने भेटतो अगदी खुप  वाट पहायला लावणारया मित्रा सारखा ,ज्याची आपण खुप  आतुरतेने वाट पाहत असतो अन तो पुन्हा नव्याने वेगळ्याच रूपात भेटतो. या मित्राच्या प्रेमासारख्याच या जलधारा ,कधि हळूवार मनावर फूंकर घालणारया,कधि धोधो बरसून आपल्या मनाचा तळ ढवळणारया ,कधि ब्रेन वाॅश करत मनावरचे मळभ स्वच्छ करणारया.तर कधि मनात इंद्रधनुचे रंग भरणारया.आनंदाचे,आशेचे ,उत्साहाचे ,प्रेमाचे,स्वप्नांचे एक ना अनेक.कित्ती समर्पक आहेना म्हणजे धुसर आकाशात संप्तरंगी इंद्रधनुचे अवतरणे तसेच दु:खी मनावर मैत्रीच्या रंगाची उधळण.तर कधि गच्च भरलेल मन ,मोकळ व्हायला आतुर जसे ढंगाची गर्दि रानावर रित व्हायला तसच काहीस .जलधारा कित्ती कित्ती रूपे ?म्हणजे गवतात दिसणारे दवबिंदू तर कधि पानावरून ओघळणारा सुरेख पारदर्शि मोतिच जणू.कधि टपटपण्याचा मधुर आवाज तर कधि मुक्त बरसणारी बरसात .कधि मंजूळ झरयाचा नाद तर कधि खळखळणारया लाटा.कधि चिंब झालेल्या वाटा तर कधि धुक्य...

आजच्या खरया कर्मयोग्यांना पत्र

 तिर्थस्वरूप ,  खरतर इथे द्यायला आजहि  अनेक नाव आहेत . त्यात आमटे कुटुंब असेल , नाम फाऊंडेशनचे कार्यकरते (नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे --),पाणी फाऊंडेशनची मंडळी (अमीर खान ,किरण राव,सत्यजीत भटकळ), अरविंद जगताप ्मेधा पाटकर ,अन्ना हजारे,राहत फाऊंडेशन,दिपस्तंभ फाऊंडेशन,सिंधू ताई सपकाळ,डाॅ कोल्हे दांपत्य ,रेणू दांडेकर ------हि यादी बरीच मोठी आहे 😌 यात येणारया सर्वच मला ध्न्यात असणाा नसणारया सगळ्यांच दिग्गज, सेवा परमोधर्म मानणारया ,प्रेरणास्त्रोत व्यक्तिंना साष्टांग नमस्कार🙏      तर पत्र लिहीण्यास कारण कि ,  परत एकदा,😄 वर्तमान पत्रातल्या पत्र विषयक लेखांत उल्लेख केलेली  अरविंद जगतांपानी एका कार्यक्रमात "पत्र लिहीण्यास कारण की "  च्या उपक्रमातून अनेक पत्र लिहीली ( प्रेक्षकांना ऐकवली) त्यात डोळ्यांतून पाणी आणनारी ,हसवणारी ,कृतकृत्य करणारी,जागवणारी,नवी दृष्टि देणारी,ओळख करून देणारी आणि बरच काही शिकवणारी पत्र होती .त्याचाच संदर्भ घेऊन वाटल की या सगळ्यांना मला भेटता येणार नाही(लगेच नाही पण नक्कि भेटेन) पण त्यांच्याशी संवाद साधता येईल .ज्यांचे ...

बाबा ची बदललेली रूप

      आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल.     आणि कालच मी एका वर्तमान पत्रात वाचल कि लाॅकडाऊन च्या काळात बाबा आणि मुलांच्यात जवळीक निर्माण झालीय अस एका अभ्यासा द्वारे दिसून आलय.    खरच अस झालय कारण लाॅकडाऊन सुरू झाल तेव्हा आणि आत्ता बाबा आणि मुलां मधले संवाद बदललेत ,नात अधिक जवळच झालय .आज त्याच सगळ्या प्रवासातल्या स्टेजेस मी तुमच्याशी शेअर करणार आहे.   तर पहिले म्हणजे लाॅकडाऊन सुरू झाल तेव्हा बाबा स्वत:शी काय बोलतोय ते बघुया( याला अपवाद आहेत जे बाबा मुलांना जास्त धाकात ठेवत नाहीत , त्याच्यां जवळ,सोबत असतात.)      " हरवलेला मी" यात बाबा म्हणतोय   मी ही हसायचो वाटत कधी कारण दिसतात गालावर दोंन्ही बाजूला हसल्यावर पडणारया खळ्या मीही असायचो कुंटुबाचा पार्ट दिसतोय फोटों मध्ये ,जुन्या कपाटात खेळायचो मीही बदाम सात, चौकट ,कँरम अन रंगायचे चेस चे डाव माझ्या सोबतही हो आठवतय पु...

बाबा ची बदललेली रूप

      आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल.     आणि कालच मी एका वर्तमान पत्रात वाचल कि लाॅकडाऊन च्या काळात बाबा आणि मुलांच्यात जवळीक निर्माण झालीय .      

बाबा ची बदललेली रूप

      आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल.     आणि कालच मी एका वर्तमान पत्रात वाचल कि लाॅकडाऊन च्या काळात बाबा आणि मुलांच्यात जवळीक निर्माण झालीय .      

बाबा ची बदललेली रूप

      आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल.     आण

नव्या वाटेवर

            Hiii😊 बरयाच दिवसात काहीच लिहील नाहीय न? हो नाहीच लिहीलय 😒 नवीन कारभार म्हणजे नवा उद्योग करत होते. I mean पैसे मिळवण्या साठी चा नाही तर असच परत आपल्या सिमे पलिकडे पाऊल टाकायचा प्रयत्न. म्हणजे जसा चाचपडत ,सुधारणा करत ब्लाॅग लिहायला घेतला तसच YouTube Video बनवत होते .प्रयत्न करतेय, आजूबाजूचे पक्षी निरीक्षण त्या चॅनलवर टाकतेय. असच लाॅकडाऊन मध्ये कुणीतरी खिडकीतून दिसणारया पक्ष्यांचे व्हिडीओ बनवून लहान मुलांना माहीती द्या अस आवाहन केल आणि मग सुरू झाला एक नवा शोध उत्साह बागेतल्या झाडांवर ,आजूबाजूला,  अंगणात दिसणारया पक्ष्यांचे फोटों व्हिडीओ काढन. त्यांची माहीती मिळवण . आश्चर्य म्हणजे या शोधात टिव्हीवर किंवा पक्षी संग्रहालयात बघायला मिळणारे पक्षी बागेतल्या झाडावर दिसायला लागले. त्यांची नाव माहीती करण्या पासून सुरूवात होती .वेडच लागल .वेळ कसा जातोय कळतच नव्हत. हे सगळ तरी सोप्प होत पण ते व्हीडीओ YouTube वर टाकायला त्यांच मिक्सींग ,एडीटींग त्यांच योग्य प्रकारे प्रेसेंट करण या सगळ्या गोष्टी म्हणाव्या तितक्या सोप्प्या न...

रोजच न्यार रूप

Image
सुर्योदय तसा रोजच होत असतो पण आपल्या मनातल्या भावनांन सारखा रोज वेगळाच दिसतो.कधि स्वच्छ निरभ्र आकाशात केशरी किरणांनी वेढलेला जणू शांत मनात आंनदाची किनार लाभलेला. कधि ढगांच्यातूनही पूर्ण ताकदिनीशी आपल्या प्रकाशाला झाकू पाहणारया अंधाराला मागे सारून आपल्या अस्तित्वाची ताकद दाखवणारा जसा एखादया मोठ्या आघातातून परत उभारी घेऊ पाहणारया मना सारखा ,ज्याच्या मुळात चैतन्याची शक्ति असतेच तिला कुठलेही मळभ कायमचे झाकू शकत नाही. कधि आपल्याच धुंदीत संपुर्ण आकाशावर अधिराज्य गाजवणारा सुर्य रंगांची वेगवेगळी वलय घेऊन उगवणारा जणू मनातल्या अनेक भावनांच प्रतिबिंब दाखवणारया .केशरी रंग चैतन्य ,ऊत्साह दाखवणारा.लाल शक्ति दाखवणारा .सोनेरी आत्मिक संतूष्टता दाखवणारा .असच काहीस त्याच्या रोजच्या वेगळ्या रूपात आणि माझ्या ,आपल्या मानसिक स्थितीत किंवा मूड्स मधे साधर्म्य असाव का?

पंढरीची वारकरी

Image
शांत आणि जरा गुढ वाटणारया आजीबाईंनां बघून त्यांच्या बद्दल जाणून घ्यावस वाटल आणि जरा लिहायचा प्रयत्न चालू आहे म्हणून त्यानां न विचारताच फोटो काढला.                                              ऐरवी म्हातारया माणसानां जरा बोलायच असत ,कुणि विचारपूस केली तर ते भरभरून बोलतात.यांच जरा वेगळच होत . त्यांच्या कडे बघून हसल तरी त्या फारसा रिस्पाॅन्स देत नव्हत्या . जनरल डब्बा होता म्हणून अंदाज लावण कठिणच होत कि त्यांची परिस्थीती नेमकी कशि आहे.थंडीचे दिवस होते तेव्हा अगदी गुंडाळून बसल्या होत्या मग मी सवईने बँगेत नेलेली एक शाल त्यांना दिली तर ती त्यांनी सिट खालची वायरची पिशवी काढून त्यात ठेऊन दिली वर चेहरा परत तसाच निर्विकारी.                                                      थोड्या वेळाने चहा वाला आला तर आजींनी त्याला एक चहा मागितला ,त्याने पैस्...

ब्लेम गेम

   लाॅकडाऊन मुळे होणारी स्थलांतरीत मजूरांची फरपट आपण सगळेच वर्तमानपत्र आणि विविध वाहिन्यांनवरील बातम्या मधून बघतो . आपल्या विकासाच्या कल्पनांवर प्रश्नचिंन्ह ठरावि एवढी विदारक स्थिती ,बायका काय अन लहान मुलं काय सगळ्यांचीच अवस्था मानवी मनाला चटका लावणारी.   हो पण सुरूवातिचे काही दिवसच असा भावनिक कमेंटस् चा पाऊस पडला जिथे आपल्या संवेदनशिल मनाचा देखावा आपण केला.आत्ता काय ते त्यांच बघतिल ,कुठे कोणी कस जाव हे ज्याच त्यानी ठरवाव .आपण आत्ता लाॅकडाऊन मुळे बोर झालो म्हणून ते कस शिथील कराव ,व्यायाम करता यावा,थोडफार शाॅपिंग करता याव,पार्लरस् उघडावित, विजबिल माफ कराव या आपल्या"माफक" फिकीरीत सध्या बिझी आहोत.      खरतर असच असण सोॆईच आहे कारण मी एकटा/एकटी काय करणार अस म्हणून आपण आपल्या विश्वात सगळी सुख उपभोगत आलोत आणि राहूही. त्यात त्या नाहीरे वर्गाचा सगळा मक्ता सरकार वा सामाजिक संस्थानीं घ्यावा असच जणू गृहीत धरल जात.      वर सल्ले देत सुटतो, सरकार चे निर्णय कसे चुकिचे आहेत, काय नियोजन व्हायला हव होत .      आपण नागरीक वा एक माणूसकी असलेले...

प्रेम आणि आई

  आत्ताच पाश्चात्यांचा म्हणतात तो मदर्स डे सगळ्यांनी साजरा केला,म्हणजे काहीनीं फक्त स्टेटस ठेवून आपल्या आयुष्यातील आलेल्या मातृतुल्य वा माया करणारया सगळ्या स्रियांचे आभार मानले ,त्यांचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे सांगीतले.      प्रेम आणि आई या दोन गोष्टी खर तर एक दिवस साजरया करणे अवघड पण त्या दिवसाचे औचित्य साधून त्या प्रेमाची जाणिव असल्याचा  व त्या व्यक्तींना त्यांच्या त्या प्रेमा साठी ऋण व्यक्त करण्याच्या उद्देषाचे हे छोटे छोटे प्रयत्न सुखावणारे ठरतात.      प्रेम निस्वार्थ प्रेम तुम्ही तिला दिसण्या आधी पासूनचे म्हणजे तिच्या उदरात तुमच्या अस्तीत्वाची चाहूल लागल्या पासून ती तुमच्यावर करत असते.      आई ,मदर,माय, माऊली,अम्मा,अम्मी या कुठल्याही संबोधनाने समोर येणारी आकृती पण प्रेम दर्शवनारीच असते अगदी मदर मेरी च्या कुशितल्या तान्हूल्या लेकरा सोबतची मुर्ती सिबंल आँफ लव.   आयुष्यात एक जन्म देणारी आई असते पण तुमच्या वर माया करणारी अनेक माणस आईच्या मायेने तुमच आयुष्य संमृध्द करत असतात.        कधी ती आज...

स्वार्थ न शोभणारा

      लाॅकडाऊन न आपल्याला मानवाच्या अनेक रूपाचे दर्शन घडविले , सेवा देणारे करोना योध्दा , भुकेल्या जीवानां अन्न पुरवणारे देवदूत, जीवावर उदार होऊन मदत करनारे सेवाव्रती.  अनेक चेहरयांचीं  अनेक नाव पण त्यात वसणार  प्रेमळ  मानवी मन.       ऐकी कडे लोक दुसरयाला मदत करायला पुढे येत होते तर दुसरी कडे या मदत करणारया देवदुतानांच लोकांच्या तिरस्काराचा सामना करावा लागत होत.    अनेक ड्युटी करून आलेल्या काही डाॅक्टर, तर  दवाखान्यातला इतर कर्मचारी वर्ग  तसेच पोलिसांनाही या तिरस्काराचा सामना करावा लागला.       हे लोक आपल्या जीवावर उदार होऊन लोकांचा जीव वाचवण्या साठी रात्रंदिवस मेहनत करताहेत आणि अशा योध्द्यांचा सत्कार ,त्यांचा संन्मान करण्या ऐवजी स्वार्थाने बरबटलेले लोक त्यांचा बहिष्कार करताहेत.     प्रत्येकाने ऐवढे स्वार्थी होऊन स्वत:चाच जीव वाचवायचा ठरवला तर दवाखान्यात एक डाॅक्टर दिसणार नाही,नर्स इतर कर्मचारी हे कोणीच या महामारीच्या काळात दवाखान्यात दिसणार नाहीत.        आत्ताच काय ...

सबका साथ सबका विकास

           " ऐक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना" ही उक्ति घरातल्या बाई पासून ,सरकार,आणि जागतिक आरोग्य संघटना(WHO) या सगळ्यानांच लागू होतेय.     घरातली माणस 24 तास घरात असल्यामुळे सहाजिकच त्यांच्या खाण्या पिण्याच्या गरजा ,त्यांचा डिमांडस्, घरातली इतर काम करत सगळ्यांना खुश ठेवायची तिची कसरत ,तिने कितीही स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला तरी तिचा ही संयम सुटतो,एकटीन हे करन आणि घरातल्या इतरांनीही जबाबदारी जाणीव ठेवून आपणहून यात सहभागी होण, फरक पडतोच.        घरात तिनेच राबायच या पेक्षा प्रत्येकान त्यात सहकार्य केल तर ती करते त्याची जाणीवही होते व त्या कामाच महत्व ही कळत वर सगळ्यांन मधे सहकार्याची भावनादृढ  होते,एकतेने, आनंदाने काम करतांना नाती सुदृढ व्हायला मदतच होते.       बरयाच लोकांनी WHO  ने करोनाला महामारी घोशीत करायला उशिर केला अस म्हटल आहे तर या संघटनेने त्यावर योग्य उपचार किंवा त्याची साथ रोखन्याच्या उपाय योजनांचा पाठपुरावा योग्य पद्धतीने वा योग्य वेळीच केला नाही असही काहींच म्हणन आहे.   ...

सुदंर जग

  गेल्या कित्येक महिन्यांन पासून संपूर्ण जग करोनाच्या दहशती खाली श्वास घेतय.अनिश्चितता,भय कुणाला मरणाचे तर कुणाला जगन्याचे साधन गमावण्याचे भय. कुठे पोटाला अन्न मिळवण्याची चिंता तर कुठे आपल्या पासून दूर असलेल्या माणसांची चिंता. असा सगळा गोधंळ माजलाय.      अस सगळ माणसांच्या विश्वात आहे,पण पशूपक्षी आत्ता माणसांना घरात बसवून मुक्त संचार करताहेत.      अनेक देशातिल प्राणी येरवी जंगलात किंवा प्राणीसंग्राहलयात दिसणारे रस्त्यांवर दिसताहेत. खरतर आपणच त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलय .असो पण या भयानक आजाराने मानवाला त्याच्या सीमा ठरवून त्यातच राहणे सक्तिचे केले आहे.    तर अश्या मानवाची लुडबूड नसलेल्या सुंदर पशूपक्ष्यांच्या सुदंर जगाचा अनोखा नजारा घरात राहूनच,खिडक्यांची तावदान किलकिली करून बघता येतोय,अनुभवता येतोय.            सकाळच्या निरभ्र आकाशात आपल्या सोनेरी किरणानीं सजलेला उगवता केशरी सुर्य आपल्या आवडत्या माणसां सोबत वाफाळलेल्या चहाच्या घोटागनीक अनुभवन्या सारखे सुख घरातच ,आहे त्या डेस्टीनेशनला घेता येतेय , मग कुठला स...

" साथी हात बढाना" संधी परत एकदा एक होऊन देशाला उभारी देण्याची

     सार जग अनामिक भितीच्या सावटा खाली जगतय.कुठे मृत्युचा भयानक चेहरा मन हेलावून टाकतो अन आपल्या जीवाचिही भिती मन कुरतडायला लागते तर कुठे हजारो हात सेवेत गुंतलेले दिसतात.       मग डाॅक्टर ,परिचारिका , स्वयंसेवक,पोलिस,रूग्णांची ने आण करणारे ड्रायवर, अत्यावश्यक सेवा देणारे भाजीवाले,धुधवाले ,किराणा दुकानदार,औषध विक्रेते अशी अनेक माणस जीवाची पर्वा न करचा रांत्रन दिवस झटताहेत. आज लोक स्वार्थी झालेत या विचाराच्या अगदी विरूध्द चित्र     बघायला मिळतय म्हणजे मोठ्या उद्योगपति पासून तर क्रिकेट स्टार, सेलिब्रीटीज या सारख्या करोड पति पांसून तर सामान्य माणस तन मन धनाने यात आपला वाटा उचलत आहेत. मदतिचे हजारो हात एकवटेत कुणिही उपाशि राहू नये म्हणून.बरीच पॅकेजेस जाहीर झालीत कामगार , रोजंदारी वर काम करणारया ,या लाॅकडावूनच्या काळात ज्यांचा रोजगार बुडालाय त्यांच्या साठी.        हे आजच वास्तव असल तरी ,आपल्या देशाची अर्थव्यवस्था कित्येक वर्ष मागे गेलीय ,हजारो उद्योगधंदे बंद पडलेत, कधि नव्हे ते निसर्गाच्या तावडीतून वाचलेली पिके शेतातच पडून रा...

कँन्डल मार्च पून्हा!

     गेले काही दिवस बळी गेलेल्या लेकींच्या सन्मानार्थ कि त्यांना श्रध्दांजली म्हणून गावोगावि कँन्डल मार्च काढले जातायत . आपल्या संवेदना व्यक्त करायचा हा मार्ग आपण अवंलबला आहे बस तेवढच ?     पण आपल्याला काही प्रश्न पडत नाहीत का कधी की या गोष्टी सातत्याने होत असतात .कधी  स्री म्हणून तर कधी अल्प- संख्याकं म्हणून तर कधी गरिब दुबळी लोक या अश्या अत्याचाराला बळी पडतात. याची कारण प्रत्येका च्या ठिकाणी वेगवेगळी असतात पण अस करणारे मात्र ताकदिने  ,पैस्याने,  मोठे असतात अन त्यांच्या लेखी ते जे करताहेत तेच योग्य आहे.        ईथेच आपली एकंदरीत समाजव्यवस्था जबाबदार ठरते.     मुली,सूना किंवा बायको या एक स्री म्हणून असल्या अत्याचाराला बळी पडतात, कधी तीने दिलेला नकार पचवता आला नाही म्हणून तर कधी हूंडा कमी पडला म्हणून तर कधी मूल होत नाही म्हणून तर कधी स्वयंपाक केला नाही,दारूला पैसे दिले नाही ,चारीत्र्यावर संशय अस कुठलही कारण चालत तीचा जीव घ्यायला .                        ...

आजोबा , "माय बाप"

         " घेता का याला जरा,मी तेवढी स्लीप भरतो." एक सत्तरीतले आजोबा दोन वर्ष वयाच्या नातवाला बाजूला उभ असलेल्या व्यक्ती कडे देत म्हटले.             सही करताच त्यांनी   त्याला परत आपल्या कडेवर घेतले.ते बाळ झोपेतून नुकतच उठल्या मुळे अधिकच रडत होते. तस त्याच कौतूक करत आजोबा म्हणाले तो फार शहाणा आहे,शांत आहे .माझ्या अंगावर आहे,तेवढ्यात त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ आले तसा संदर्भ देत ते सांगू लागले ,"यानां माहीत आहे त्याची आई सहा महीन झाले निघून गेलीय."       हा सगळा संवाद आपसूकच माझ्या कानावर पडत होता आणि नकळत मी त्या बाळाच्या आईचा विचार करू लागले ,म्हणजे नक्की काय झाल असेल? ती एवढ्या छोट्या बाळाला सोडून का गेली ?            त्यात त्यांच्या घरात दुसर कुणीच नसेल का त्याला सांभाळणार कारण झोपलेल्या बाळाला ते सोबत घेऊन आले होते.        खरतर येरवी एखाद्या आईला बाळाला घेऊन काम करायची हतोटीच असते पण आज हे आजोबा त्याचे माय आणि बाप झालेत.