दिल तो बच्चा है जी
आज ऐक बकरी चारणारी बाई व तीचा मुलगा एका बकरीला पकडायचा प्रयत्न करत होते ,ती कळपा पासून दूर जात होती तेवढ्यात समोरून एक आई आणि तीची दोन मुल चालत येत होती तर त्यांच्या समोर ती बकरी आली आणि चक्क त्यातील आईने अगदी जीभ बाहेर काढून तीला पकडण्याचा प्रयत्न चालू केला .कधी ईकडे तर कधी तिकडे दृष्य अगदी सुंदर होत . मुल आपल्या आईला अस बघून हसू लागली. आपल वय विसरून तीचा तो प्रयत्न नकळत माझ्या ओंठांवर हसू देवून गेला. निरागस पणे केलेली कृती लोभसच असते की . ऐखाद आवडत फळ जस की आंबा मिटक्या मारत, खाण्यात अगदी तोंड ,हाथ भरवून भारीच वाटत. त्यात लहाणपणी उपभोगलेला आनंद आजही तीच पध्दत( म्हणजे आंबा खाण्यची )बालपणात घेऊन जाते. झोपलेली व्यक्ती ती वास्तवात रागीट असली तरी निरागस वाटते,मधेच त्या चेहऱ्यावर येणार हसू त्याला क्यूट दिसतोय/दिसतेय अशी कमेंट देऊन टाकत. ज्याला गुदगुल्या होतात ते तर बोट लांबूनच हलली तरी हसायला लागतात आणि प्रत्यक्ष गुदगुल्या झाल...