Posts

Showing posts from 2021

ब्रँड के आगे लाचार ,न समझे गरिब का हाल

Image
  इथे शाँपिंग करता हजारात तरी विकत घ्यावी लागते बँग  ते अरबो पति ,जपताय त्यांच नाव ,इमेज, पेपर बँग वापरून आणि घेतोच आपण ती पैसे जास्तिचे देऊन  इधे ही ट्राँली भर सामान ,कधि काही हजारावर मिॆळते पिशवी कापडी Freee,freee तर कधि घेतोच विकत झक मारून पिशवी तिच. पण --------- यांच्या कडे करतो जास्तच डिंमाड ,पिशवी नाही दिली तर सोडतो दुकान , चार प्रकार ची फळ चार कॅरीबँग यासाठी देतो कुठे आपण जास्त दाम ना तरस इनपे आता है ,न गरिबों से काई हमारा नाता है पर क्या हमे सच अभि भी नजर नही आता हैं आदत अभि बदललो ,तुम्हारे पाॅकेट के साथ कुछ चिंता धरति की भी करलो "Say no to plastic ,please use clothe bags 🙏

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल

Image
   कौन बनेगा करोडपति च्या मंचावर आलेल्या काहि स्पर्धकां पैकी हे दोन शिक्षक ,त्यांची शैक्षणिक पात्रता वाखानण्या जोगी आहे पण तरिही त्यांना त्यांच्या विद्या दानाच्या कार्याचा मोबदला त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणात मिळत नाही.       आईवडिलांनी कष्टाने ,आपल्या पोटाला चिमटा देऊन उज्वल भविष्याच्या आशेने मुलांना शिकवले. पण या हाडाच्या शिक्षकांना त्या कामातुन कुटुंब चालवण कठिण होत . मग काही जोडधंदा वा प्रसंगी मजुरी करूनही त्यांना आपल्या कुटुंबाच्य उदरनिर्वाहाला हातभार लावावा लागतो.           का हि अवस्था व्हावी ? तर शिक्षण क्षेत्राला नफा देणारा धंदा बनवणारया /समजणारया शिक्षण सम्राटानां जसा विद्यार्थ्यान कडून फी च्या रूपात गडगंज पैसा लाटायचा असतो तसाच शिक्षकाची नोकरी देण्यासाठी त्यांच्या कडून लाखो रूपये घेतले जातात.        मग येवढा पैसा देणारा कर्मचारी शिक्षक म्हणून नोकरी करत नाही तर ते पद त्याने विकत घेतलेल असत आणि सहाजिकच त्याला या पैशाच तिळमात्र ही द्यान नसत आणि शिक्षण देण्याची तळमळ तर नसतेच ,ते फक्त मस्टरवर सहि करणारे नामधारी...

We are the dumping ground for all that world can reject

Image
     हे फक्त एक चित्र ,माझ्या म्हणन्या चा प्रत्यय यावा व चित्र बघुन वाचायची इच्छा व्हावी म्हणून .        आज आपण भारतिय जे आपल्याच संस्कृतिचा, संस्कारांचा भाग आहे तेच अगदि फाॅरेन रिटर्न किंवा तिकडच लेबल लावून येत ते अंगिकारण म्हणजे पुढारले पण किंवा आधुनिक जीवनशैली आत्मसात केली अस मानतो.    योगा हा भारताने जगाला दिला अस म्हणतात आणि ते खरच आहे. पण याची ओळख आपल्याला जास्त कधि झाली किंवा तो एक व्यायाम किंवा वर्कआऊट किंवा आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा भाग म्हणून आपण केव्हा स्विकारल तर जेव्हा इंटनॅशनल योगा डे साजरा व्हायला लागला तेव्हा .आता काही म्हणतिल कि आम्ही बरयाच वर्षां पासुन करतोय तर ते खरोखरीच जागृत नागरिक म्हणजे काय ट्रेंड आलाय म्हणून तस करतोय अश्यातले नाही तर ते माझ्या आरोग्या साठी उत्तम वा महत्वाच आहे म्हणून .       खरतर योगा फक्त काही आसनांन पुरता मर्यादित नाही तर ती एक उत्तम जीवनशैली आहे. पर्यावरण पुरक ,संयमी ,संतुष्ट, प्रेरणादाई ,सेवा वा एंकदरीत स्व:कल्याणातून विश्व कल्याणाकडे नेणारा जीवन मार्ग  . ते कस? ते आज नाही परत कधित...

भारत के युवा जाग जा

Image
  आहोत आपण सुखी पण सुख सांभाळाव लागत ते सांभाळण्या साठी सतत काही तरी नव नव कराव लागत असला समृध्द वारसा हे आपल भाग्य आहे करंटे  निघालो हे देशाच दुर्भाग्य आहे          " भारत के युवा जागजा" हमारे हवाले कर गये है वतन वो शहिद शहादत की उनकी क्या किमत नही झगडेगें आपस में तो, लड मरेंगे और जन्नत सा देश हमारा  फिरसे क्या गुलाम करेंगे युवा हो तुम, 'ताकद' देश की  सारे जहाँ मे न कोई इतने जवाँ है ठाँन लो के अब अपने देश की सेवा हम करेंगे सारे जहाँ में हम नाम अपने वतन का ऊँचा करेंगे  न केसरी ,न निला ,न हरा धरेंगे  हम हिंद के बच्चे है  बस हाँथ में यारों तिरंगा धरेंगे

आंधळा राजा ,"मतदार" आणि धूर्त लबाड लोकसेवक

Image
   आम्ही आंधळे नी मुर्ख चिकटवले लेबल जाती-धर्माचे अन घेतले झेंडे ,भगवे ,निळे अन हिरवे यातच हरवलो मग------- दिसलाच नाही कावा त्यांचा आपल्याला गुंतवून या गुंत्त्यात ते गले लठ्ठ झाले खाल्ल सार सार काही  चारा ,कधि डांबर , कधि रेती ,कधि राशन  कधि घर तर कधि शवपेट्या ही शहिदांच्या खाल्ल्या तुकडे टाकुन आश्वासनांचे ,  घोषणांचे आरक्षणांच्या  तर कधि मंदिरांचे आणि पुतळ्यांचे हे टाळूवरच लोणी खाऊ लागले आणि आपल्याला आपल्याच हक्कांसाठी भिकेला लावले किती दिवस जगणार आहोत हे गांधारीच जिन आपल्यातल्याच कुणाला तरी व्हाव लागेल कृष्ण!        कली युगातले हे कली आहेत पांढरे कपडे आणि काळी कर्णी   व्यवस्था झाली द्रोपदी आपल्यातल्याच काही युधिष्टिरांनी लावला तिच्यावर डाव जागा आत्ता तरी --+++ पट्टया काढा स्वार्थाच्या ,जाती -धर्माच्या खावू नका यांनी दिलेली  भेदभावाची गोळी आपल्याच तर मढयावर शेकताहेत  ते त्यांची राजकारणाची पोळी

नवा दिवस नवि आश

Image
  रोज नवे रंग लेऊन येते सकाळ नव्या आशेचा नवा प्रकाश रात्रीच्या उदरातून उगवणारा सुर्य अस्ताला गेलेल्या सकाळचे रंग हे चक्र असच चालणार असत तेच चक्र तर आपल्या ही आयुष्याच असत कधि दु:खं तर कधि सुखं ,येत जात राहतात रोजच नवे काही धडे देऊन जातात  शिकायच असच प्रत्येक धड्यात काही तरी त्याशिवाय ही जीवनाची परिक्षा देता येत नाही पडतो ,म्हणून तर उठायच शिकतो येणारा क्षण जाणारच तर असतो आज आहे ते उद्या काल होणारच तर असत अडचणि फार कुरवाळत बसायच नसत त्या सोडवून पुढे तर जायचच असत             अस करत करत तर             आयुष्याच गणित सुटत          कुठे वजाबकी तर कुठे गुणाकार होतो सरते शेवटी आयुष्याच्या फक्त शुन्य तेवढा उरतो

आपण बघे

Image
       कोकणातल्या दरडी कोसळण्याच्या घटना ,कोल्हापुर, सातारा भागातले पुर या आपल्या  महाराष्ट्रातल्या मागच्या वर्षी आणि याहि वर्षी घडलेल्या काही घटना .हे आपल्या भागात घडणार नाही असाच काहीसा समज इतर भागातल्या नागरिकांचा असावा ! नाही , तो असतोच ! मग ? आपण काही दिवस हळहळतो, यंत्रनेला दोष देतो , काहि लोक मनापासुन मदत करतात अगदि तन-मन- धनाने तर काहि फोटो, प्रसिध्दि किंवा आपले महान पण गायले जावे म्हणून  मदत करतात .     वरचा फोटो एका वर्तमान पत्रातला आहे जो ऐरविही दुर्घटनांची हिच कारण असतात हे दाखवतो . मग हि कारण गेल्या किती तरी वर्षां पासुन आपल्याला माहित आहेत म्हणजे मुंबई व पुण्यातल्या भयंकर पुराच्या वेळीहि तेच सांगितल गेल नदिपात्रात भर टाकणे ,अनधिकृत बांधकाम ,नाले/ गटारीं मधे बेशुमार अडकलेल प्लॅस्टिक , वृक्ष तोड,संपुष्टात आलेली खारफुटी व नदिकाठावरची संपवलेली झाड  , जी पुराला काही प्रमाणात अटकाव करू शकतात आणि पर्यावरणाचा असमतोल ज्या मुळे वातावरण व ऋतूचक्रात बदल घडतात.              या सगळ्यात पर्यावरणाचा असमतोल घालव...

पाऊस वैरी

Image
  वाहून गेली सारी आशा  वाहून गेला आता भरवसा येतो सांगा पाऊस हा कसा ?                  कधि कोरड्या ठक्क विहिरी                 कोमेजलेली पिके हिरवी                 रानोमाळी भटकंती करिती         गुरे बिचारी पाण्याच्या त्या थेंबा साठी           डोळे लावतो आभाळा कडे             तुझ्या येण्याचा भास कुठे तरी        मग अचानक फाडून येतो आभाळच सारे गाडून टाकतो , उमललेले स्वप्न पसारे      वाड्या वस्त्या उजाडून सारया  वाहतच राहतो ,बरसतच राहतो अश्रू देवून डोळ्यातूनही  प्रलयाचा आभास करवतो आस लावतो तुझ्या येण्याने  रूजण्याची रे ,फुलण्याची रे मग तू का येतोस असा? वैरी म्हणून , संपवून जातो सार सार -----

मलबा

Image
       मलबा सपनो का ,मलबा अपनो की लाशो का मलबा         मलबा सजाये हुँए घरो का            संजोये हुँए धन का मलबा खेतो मे ं लेहलेहाती फँसलो का            उजडी बांगो का मलबा       आँगन में बँधे पशुओ का मलबा      झुँटे वांदों का मलबा ,सियासी रांजों का मलबा मलबा मलबा मलबा कई बार बांधी हुँई हिंमत का मलबा

पुस्तक मैत्री

Image
                               झाली पुस्तकांची मैत्री                      पानो पानी चे लेख जागविती किती किती रात्री                             मर्ढेकरांच्या काव्य पंक्ति                          कुसुमाग्रजांची शैली ओघवती                             वि.दा.ची कविता बोलकी                   आरती प्रभु ,सुरेश भट ,विठ्ठल वाघ                  शांता बाई ,पु.ल.आणि किती किती नावे घ्यावी                                प्रत्येकाचा बाज वेगळा ,               ...

शोध इथे संपतो फक्त तो घ्यावा लागेल

Image
     आत्ताच टोकियो आँलंपिक झाल , नंतर ज्यांना पदकं मिळाली त्यांच कौतुक व ज्यांना त्यात अपयश आल त्यांना बसल्या जागेवर शिकवण व भारत कसा या बाबतित अपयशी ठरतो ,आपल्या देशात खेळा साठी काहीच करत नाहीत इत्यादी दुशन.           चायना आपला शेजारी आणि म्हटल तर प्रतिस्पर्धी सगळ्याच बाबतित. तर हा देश कुठल्या प्रकारची स्पर्धा आणि कुठल्या लेव्हलची स्पर्धा करतो ,कुठल्या इर्षे पोटी आणि त्या साठी इतर व त्याच देशाचे नागरिक काय काय भोगतात हे सामान्य ,बापुड्या व ठराविकच बातम्या बघणारया लोकांना कुठे माहिती आहे नाहि का ?          आत्ता काहि पत्रकार जसे आपल्या देशाची काळी बाजु जाणतात ति जगा समोर आणतात तसच काहिस चीन च्या बाबतितही आहेच कि. कितीही लपवल तरी जस वुहान च वास्तव समोर आल तसच चीनच खेळातल्या या यशा मागच रहस्य काहि अभ्यासक व पत्रकारांच्या  पाठपुराव्याने समोर आल शिवाय सगळ्यांच्याच हातात असलेला हा मोबाइल पण बरीच स्टिंग आँपरेशन्स करत असतोच की.         सगळ्यांनीच वाचलय की नाही माहीत नाही पण चीन पहिल्या आँलंपिक मधे फार का...

निसर्ग सखा

Image
   नाद आहे मज रान फुलांचा खुनाविती ते हिरवे डोंगर सळसळत्या वृक्षांची पाने  गाती मज कानात गाणे संथ वाहती शुभ्र नद्या त्या साद घालीती मज ह्रदया निवांत सांज अन मावळतिचा सुर्य नजारा भुलवितो शहरातिल झगमगाट सारा सुर्योदय रोजच फुलवितो  नव आशेचा मोर पिसारा

ख्वाँफ के सायें

Image
सायें ख्वोफ के ये कहाँ ले चले हमे हम तो हमारी ही जमी से परायें हो चले क्या खोया हमने इन बंदुको के सायों में दिनरात जल रहें धुँये और अंगारों में सायां हि मानो डर बन गया हमारा   पास से गुजरने वाला हर बम  हो   या हो गोलियों की बौछार          आदत बन गई          खुन के छिंटों से हर दिवार रंग गई     गली में कोई घर न बचा  जहाँ मौत कि दस्तक न हुँई       बच्चा हो या  बुढाँ हर शक्स डरा हूँआ        औरतो का तो  हाल बहोत ही बुरा हुँआ   अभी तो वो जरा डट के खडी थी   उम्मीद उसने भी अपने मन में भरी थी पर्दा नशीन ही सही नये हौसले पायें थे हाथ में उसने भी अब हथियार ऊँठायें थे            अब न हौसला रहाँ ना उम्मीद कोई            उजडी हुँई बस्तियों मे ं चिंखो की आवाज है          भागता हर शक्स जिसे कही और जिने की आँस है            बस्तियाँ और भी बस जायेंगी कँ...

में आज भी हूँ मांगता आजादि

Image
   मे आज भी मांगता हूँ आजादि  जातीपाती के झंगडो से  धर्म के नाम पर हो रहे उन लहु के दंगो से |       मे आज भी चाहता हूँ आजादी बेटियों की जख्मों से और जलरही  दुल्हनों कि लाशों से      आज भी मांगता हूँ आजादि  मासुमों के आँसुओं से और  कुपोषीत मुरझायें हुए उनके शरिरोसे      आजादि आज भी चाहता हूँ में       किसानों कि बिगडी हालत  से     और लटकती हुँई उनकी लांशो से       आजादि मांगता हूँ आज भी               गंदी गलियों और             खड्डो भरे रास्तों से भी    आजादि चाहता हूँ आज भी        भ्रष्टाचारी नेताओं से  और उनके झुँटे वांदो से           फिर लडनि है लडाई  आजादि की              ईन समाज की बुराईयों से तभी जाके सफल होंगी कुर्बानीया उन विरों की          शहिदों की ...

आजच्या आईचे मनोगत

Image
  शिक्षण आणि संस्कारातले  काय आणि कसे द्यावे मुलांना मज न कळे ,मज न कळे,मज न कळे मी आई या युगातली मज पुढे हे प्रश्न किती?     संध्येची शुभंम करोती विसरली हि पिढी      काय देश प्रेम अन संस्कृतिची जोपासना    भरकटलेल्या या मनांनचा थांग काही कळेना सतत आपले इंग्रजाळलेले भाव अन आवडी नको पोहे हवा पित्झा,नको कविता रॅप हवा   देशी कापड ही त्यांना फँब इंडियातला हवा मौज कसली त्यांना वाटे ,फिरवीती फक्त मोबाईलवर बोटे कुठे चाललो ,कुठे हरवलो हे त्यांना ना काही कळते            काही म्हणती ,"मुले देवाघरची फुले"            काही म्हणती ओल्या मातीचे ते गोळे उमलु द्यावी त्या परी की? ठोकुन आकार द्यावा    काय करावे मज काही काही कळेना आता या लेकरां साठी रिती करावी कुठली ओंजळ  मज काही ही कळेना!

मस्ति की नई पाटशाला

Image
       हि चिमण्यांची नवी  टिम सध्या बागेत चिवचिव करतेय. या पिटुकल्या दिवसभरात चार पाच दा तरी येतात ,प्रत्येक वेळी विचारून ,"काकू आम्ही खेळू का बागेत?"       कधि कधि हातातल काम सोडून त्यांच्या बोलवण्यावर दारा पर्यंत जाण्याच जरा जीवावरच येत.      पण खर पाहता तो कधी सहजच लटकवलेला झोका इतक्या निरागस चेहरयांवर हसु फुलवतो आणि विशेष म्हणजे या मुलिंना काहि तास का होईना मोबाईल पासुन ,टि.व्हि.पासुन दुर ठेवण्यात यशस्वि होतो याचा जास्त आनंद व समाधानही वाटत.      मग फावल्या वेळात मी हि त्यांच निरीक्षण करत त्यांच्यात चाललेल्या निरागस संवादाचा आणि खेळाचा मनसोक्त पण लपून आनंद घेते.    मी त्यांच्या कडे बघतेय अस जाणवल की त्या थांबून जातात आणि मलाही त्यांच्या खेळात व्यत्यय आणल्याच वाईट वाटत.       आज सहजच यांनी (आमचे हे) सोमनाथ परबांच  " नदिला आला पुर,पुराला  पायरया शंभर  ,आनंदा येई बहार," अस काही तरी बालगीत लावल तर त्या मजेत नाचायला लागल्या.       आणि या फिंद्र्या( हे यांनी माझ्या ...

चांदण्यांच झाड

Image
       क्षितीजावर उभे तरू हे          देई साक्ष मिलनाची  धरणी हिरवी अन ढगाळ अंबर बरसण्या आतुर ,ओथंबले ढग  तृप्त चराचर , तृप्त तरूवर हा आगळा , न शाल हिरवी पांघरली न दाटी फांद्याची झाली  नक्षी नवी चांदण्यांची लेवून  सजले जणू पोर्णिमेला अंबर    आकाशीचे तारे संभार ,या तरूचा अंगावर  झाले हे चांदण्यांचे झाड

बुलबुल च बांधकाम

    आज किचनच्या खिडकी समोरच बुलबुल ची जोडी सारखा गोंधळ घालत होति , एक उडून जायचा तर दुसरा यायचा ,मग पानांन खाली हालचाल दिसली तर नुकतर घरट बांधायला घेतल्याच दिसल.फांद्याच्या त्रिकोणात ,गवताचे धागे विणत हे सुरू झाल . येव्हाना बरयाच पक्ष्यांच्या घरट्यांची माहिती झालिय त्यात सुगरण बाई आणि शिंपी यांच काम जरा जास्तच किचकट ,जिद्दीच व सुबक असत .       तर कावळा ,सांळुखी ,पारवा ,चिमणी यांच आपल काटक्या ,वाळलेले गवत , कापुस कोंड्याच्या फळातला कापुस वा धागे अस जे अवेलेबल असेल त्यातुन अंडी देण्यासाठी सोईच अस घरट असत.      बुलबुलच पण बारीक, लांब गवताचे वाळलेले  धागे सद्रृष्य पाते विणुन जरास उथळ वाटी सारख घरट मी माझ्याNisarg thewa japuya gadya या चँनल वरच्या सुरूवातिच्या व्हिडीओज मधे चिकुच्या ,लिंबाच्या  झाडावरच्या  घरट्यांचे फोटो टाकले होते.          पण  खिडकितुन दिसणार घरट बघुन जरी आनंद झालाय तरी येणारया अंड्याच वा पिल्लांच भवितव्य धोक्यात आहे कारण ते मांजरींच्या सहज नजरेस पडणार व त्यांना पोहचायला अगदीच सोप्प आहे. ...

धरणीचे अश्रृ

Image
   आज निसर्ग संवर्धन दिवस ,वरच चित्र वास्तवाच भान करून देणार , आणि रोज पुर ,ढग फुटी , ढासळणारया दरडी याच्या चित्रां मधुन निसर्गाचा दिसणारा आक्रोष ?????           संथ वाहणारया नद्या कोपल्या                 ढासळणारे डोंगर कडे                  विध्वंसाचे रूप वेगळे                 वणव्या ने ही  कहर जाहला                    काळवंडली जंगले                 राख झाली वनराई ती                 आक्रोष चोही कडे              पोरकी झाली किती पाखरे                   वने रिती  ,मुकी           धरणीला त्या तडे पडले              उभे डोंगर पोखरले         ...

पाऊस

    पाऊस जो अनेक कवीनां प्रेरीत करतो ,पाऊस ज्याच्यावर असंख्य गाणी ,कविता कित्येक वर्षा पासुन लिहिल्या गेल्या ,लिहिल्या जातायत आणि पुढे ही लिहिल्या जातिलच.          प्रत्येका साठी हा वेगळाच असतो काहीं साठी मस्त भटकंति तर काहिं साठी वाफाळणारी अद्रक वाली चाय काहिं साठी , भजींचा बेत तर काहीं साठी निसर्गाची निवांत भेट.      अरे यमक जुळल का ?😄  असच होत हा मोह अनावर होतो मग उगाच वाटत जमतय की ,पण त्यात इतकी काही ताकद नसते कि ते इतरांना हि आवडेल पण हा पाऊस वैरि या गोष्टीं सांठी उचकवत(प्रेरित करतो किंवा मोहित करतो) असतो    फक्त पाऊस पडतांना पाहण ही खुप सुखाऊन जात.रिमझिम पाऊस ,गार वारयाची झुळुक जेव्हा काही थेंब अंगावर घेऊन येते तेव्हा काय वाटत !---------,शब्दात नाहीच वर्णन करता येत ,काहि अनुभव आपले आपणच घ्यायचे असतात आणि त्याची अनुभुति अर्थातच माणसा परत बदलत असते.             तर enjoy मग -----    पाऊस लाडका हवा हवासा   मन तृप्त ,स्वच्छ करणारा सखा पाऊस जलधारा ,पाऊस उनाड वारा पाऊस नयन ...

भेटी लागे जीवा लागली से आस

Image
     अगा पांडुरंगा ये धाऊन बा आता      जीव कसाविस झाला दर्शनास तुझ्या       धाव घेती डोळे पढंरीच्या वाटेवर          डोळ्यात आस आहे तुझ्या भेटीची रे      सावळे सुदंर रूप तुझे माऊली        दिसे ठाई ठाई भेटु कशि तुला माऊली विठाई चंद्रभागेचा तीर मारीतो रे हाक तोडुन पाश संसाराचे  येत होत्या लेकी तुझ्या  माहेर ची होेते त्यांचे  वाळवंटी पंढरीच्या  तुळशी वृंदावनीची  रूसली सावळ्यारे  टाळ -मृदंग झाले मुके चिपळ्या ही देवा आता शांत झाल्या तुझ्या विरहात अश्रृधारा बरसल्या

" Do nothing " हे चाॅकलेट देत सांगायच का?

Image
  आज लहान मुल आणि तरूण(बरयाच मोठ्यांचाही) चाॅकलेट अतिशय प्रिय पदार्थ आहे  त्याची हि जाहिरात.      खरतर जाहिरात ति तद्दन वस्तु कशि महत्वाची व योग्य आहे हे पटवून देत असते काहि वेळा त्यात अतिशयोक्ति ही असते आणि त्यावर बरेच जोक्स हि होतात .       "संतुर " साबणाची जाहिरात ज्यात  स्री कशी साबणा  मुळे आई असुनहि तरूण दिसते  अस दाखवलय मग पुरूषांच्या बाबतितही तस होत या अर्थाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत असतात.      " दाग अच्छे है " म्हणत मदत करायला शिकवणारी जाहिरात. स्रीला हि तिच अस अवकाश आहे हे दाखवणारी(तेल/चहा) जाहिरात , मुलां नाही मुलीं सारख सगळ काम आल पाहिजे हे सांगणारी जाहीरात, काहि जाहिरातित तर आत्ता पुरूषही घरातील मुल व पत्निला सर्व करतांना दाखवतात तर काहि याच्यात मशिन मधे कपडे टाकतानां.      हि काहि जाहिरातिंची उदाहरण जी समाज परिवर्तन व मुल्ये शीकवणीरी .       पण वरची चाॅकलेटची जाहिरात ,काय सुचित करते? तुम्हि स्वत:तच मग्न व्हा ? कुणि मदत मागत असेल तर करू नका?  (जरी त्या प्रसंगात त्या...

सकारात्मक चॅलेंज Let's see,accept & chage your mistakes

Image
   दिव्य मराठीच्या एका विशिष्ट पानावर अश्यातच सुरू झालेली ही चॅलेंजेसची गंमत .     सुरूवातिला कौटुंबिक स्थरावर वेगळे पण याव ,घरात हसत खेळत नविन काहि तरी करून मुल व मोठ्यांना सहभागी होता येईल अश्या छोट्या छोट्या कृति नीं सुरू झालेल हे , आज काहि तरी मोठ्ठ पण स्व: परिवर्तनात महत्वाची भुमिका बजावणार अस चॅलेंज.          प्रत्येकाच्या हातुन चुका या होतच असतात ,लहाणपणि लहान तर मोठे पणि लहान -मोठ्या😉 (हो बरिच मंडळी सहमत असतिलच)            लहाणपणि  होणारया चुका बालिश ,सहजच माफि मिळण्या सारख्या आणि बरयाच अंशी बदल घडवून आणनारया .       बालपणि मुलांना मोठ्यां कडून विशेष सल्ला वा ताकिद असते कि चुक झालि तर ति कबूल करावि आणि काहि घरात ति परत  होवू नये म्हणून ," देवा समोर उभा रहा ,कान पकड आणि म्हण मी परत अशि चुक करणार नाही."        अस चुकिच परिमार्जन वा देवाला साक्षि ठेवून ती परत न करण्या ची शपथ दिली जाते.         पण जस जस मोठ होत जातो तशी चुकांची पध्दत व तिव्रता ...
Image
           रास्ते पथरिले ,है ये तेरे लिए           मुश्किल मंजीले भी है          दौर है कठिनाईयों का          पल पल अनजानासा                  हाथ थामले है बंदे        अब तु हिंमत और आशाओं का       कोशिश करना न छोडना तु      न डरके ,हार जाना          मुश्किलो के इस सफर में    ख्वाब देखना ना तु छोडना   है सफर अनजाना ,डगर भी कठिन है        पर  गिरके ऊँठना         हार के जीतना  यँही तो जींदगी है यँही तो जींदगी है            

Don' t judge a book by its cover

Image
    पूर्वि एकदा शांता बाईंच  "पावसा आधिचा पाऊस" हे पुस्तक वाचल होत , त्यात त्यांनि एका चित्रांला बघुन लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असु शकतात याचा छान संदर्भ दिलाय  त्याची आठवण राँबिन शर्मा च हे पुस्तक वाचतांना आली.       गम्मत अशि कि मी पुस्तकाच नाव वाचुन ठरवल कि यात काय असेल कि ,हे जग ,यातली नाती  स्थाई नाहित तर तु त्यात अडकु नकोस , निर्विकारी हो ,मोह सोड अस बरच .      किंवा      "जण पळभर ंम्हणतिल हाय हाय" या  भा.रा.तांबे यांच्या कवितेची आठवण  झाली.     मग सहजच पुस्तक चाळायला घेतल तर --------         पुस्तक अगदिच वेगळ ,जीवन मुल्ये शिकवणार ,जीवनात काय? ,कस? ,केव्हा? कराव अस बरच सांगणार .     पहिल्या लेखात ,"Discover your calling "     तुमच्यातल अस बेस्ट शोधा,त्या नुसार मार्गक्रमण करा हे सांगताना ते सांगतात कि त्या  साठी तुमच्या हातातला जाँब सोडा अस नाही तर जे तुम्ही करता त्यात बेस्ट करा ,झोकुन द्या. तेव्हाच ते  गांधीजींच्या विचाराचा संदर्भ ...

जगणे

      मरणा हून कठिण जगणे झाले,       गडद होणारया अंधारात       प्रकाशा चे कवडसे हि        नाहिसे झाले        कोण ,कुठे ,कधी         जाणार आहे     हे कुणा ना  कधिही कळणार आहे      आहे आज तुझे जे        उद्या असणार नाही  काय नेणार तु  काय घेणार आहे       सिंकदराच्या मोकळ्या      मुठीत जग कुठे सामावले      जगजेत्त्या त्या राजाला ही      सोबत काहीच ना नेता आले ओझी डोक्या वरली  अन मना तली ही  उतरवून घ्या वी सारी          कसले ते रूसवे        कसल्या त्या शिकायती      माफ करूनि आपुल्यांना        आपणही मुक्त व्हावे गात गाणे आपुल्याशीच   जगावे अन जगुद्यावे                                 ...

ख्वाँईशो का कोहरा

 ख्वाँईशो के कोहरे घने और घने होते रहे         कभी पेंट के लिए         जिने वाले         रोंटी ,कपडा और मकान          के लिए रेंस             करनें लगे ख्वाँईशो का जाल  और बढता गया झोपडें से घर,  घर से मेंहल,  फिर मैं और तेज भांगता गया                राहे नई               मंजीले नई                 नई फिर                 दौड हो गई हर पल सब से  मानो होड  हो गई         ईन सब में          न जाने         में कहाँ         और रिश्ते कहाँ गेहरे हुएँ कोहरे में  ख्वाँईशो के  मैं खुदि ही को फिर ढुँडता रहा ¡¡¡¡¡             

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.

     खर आपल्या मराठीतल्या म्हणि आपल्या दैंनदिन जीवनात अगदि चपखल बसतात .अहो म्हणजे काय ? म्हणूनच नाहि का त्या आपल्या संता करवी वा वाङमयातून ,बोली भाषेतून पिढ्यानंपिढ्या चालत आल्यात ,रूढ झाल्यात .   आत्ता च्या शिर्षकातिल म्हण इथे आठवण्याच कारण हि तसच घडलय हो--      पाय फ्रँक्चर झालाय आणि चार दिवस आयत मिळाल्यावर वा गिळल्या वर घराची ,प्रकर्षाने स्वयंपाक घराचि आणि घरातिल इतर मंडळिंची लागलेली वाट !, बघून शेवटी ठरवल कस का होईना आपण जमेल तसा स्वयंपाक करायचा .     झाल मग पहिला दिवस, पोळ्या खुर्चिवर  बसून  केल्यात.पण बसल्या बसल्या पोळीचे काठ जाडच राहायचे,तव्या वरची पोळी अंदाजाने  भाजली की कच्चीतरी रहायची नाही तर जळायची तरी ,उभ राहून करायची सवय दुसर काय?     मग परत ठरवल काय हरकत आहे स्वयंपाक तर करायचाय फक्त एका पायावर उभ राहून करूया आणि दुसरा जस्ट टाच टेकवायची बस.       मग नाश्ता ,दोन्हीं वेळचा स्वंयपाक होतोचय त्या मुळे स्वंयपाकघर व इतर मंडळींची होणारी हेळसांड बरयाच अंशी कमी झाली कारण त्यांना आत्ताही बरीच त्यांच्य...

अंधारल्याला वाटा

Image
  वाट चुकलेली  भरकट लेली धुरकट ,ढगाळलेली अंधारलेली ,  अनामीक , ध्येयहिन  दूर दुर नेनारी हरवणारि  हिरावणारी नाती ,स्वप्न  गमावनारी गुढ गुंत्यात  गुंतवनारी कष्ट  देणारी   नष्ट करणारी वाट वाट अंधारलेली  सार सार गमावनारी

मी जबाबदार

Image
   सुंदर ,योग्य शिर्षक आणि मजकुरही . आपण नागरिक म्हणून शिस्त पाळली तर अनेक समस्या कमी होतिल किंवा समस्या निर्माणच होणार नाही.तुम्ही म्हणाल हे कस ? आपली लोक संख्या इतकी आहे कि मुठभर राज्यकर्ते किंवा प्रशासन काहि सगळ्या गोष्टिंच ,समस्यांच निराकरण करू शकत नाही आजची परिस्थिती पाहता हे तुम्हाला पटेल ही.       आधिच लाँकडाऊन बरया पैकी सर्वांनी पाळल पण नंतर करोनाची खिल्ली उडवली.न मास्क लावले ना सोशल डिस्टंसिंग पाळल ,हात धुतले की नाही कुणास ठाऊक.          आपण भारतिय लोक बरयाच बाबतित ग्रेट असलो तरी नियम पाळण तेहि काटेकोर आपल्याला फारस जमल नाहिच.      ज्या गावांत लोकप्रतिनिधि व गावकरयांनी मिळून स्व:ता सगळे नियम पाळलेत ,योग्य नियोजन केल ति गाव करोना मुक्त राहिलीत .          आपली लग्नं ,मरणं ,सोहळे आपणच साजरे करून एका घरात बरयाच लोकांना करोनाची लागण करून घेतली.          जस कुंभमेळा थांबला पण लाॅकडाऊन मधे दिलेल्या सुटिच्या वेळात अजुनही गर्दी करण थांबल नाहीय.     दुकानं ,भाजी बा...

ज्योतिबांचा शोध जारी

Image
       आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती .महात्मा हि पद्वि मिळण्या मागे त्यांच महान काम आहे यात कुणालाच शंका नसावी. मागच्याच महिन्यात सावित्रीबाईंची 10 मार्चला पुण्यतिथी झाली.त्या आधि 8 मार्चला जागतिक महिलादिन साजरा केला गेला, हो !  तो बरयाच प्रमाणात फक्त साजरा केला जातो बैलपोळ्या सारखा .म्हणजे सगळ जग साजरा करत म्हणून बायको,आई ,मैत्रिण यांना शुभेच्छा देऊन ,एखाद गिफ्ट ,बाहेर जेवायला नेण अस सगळ करून तिला एक दिवस पलको पे बिठाने जैसा फिल करवल जात. आपण हि भाळतो ,काहिनां कळत पण काय हरकत आहे एक दिवस स्पेशल फिल करायला. एक दिवस तर एक दिवस.    पण त्याच दरम्यान जगभरातल्या महिलांच्या कौटुंबीक,आर्थीक,सामाजीक व आरोग्यविषयक स्थितीची वास्तव माहीती समोर आलि.अनेक वर्ष दहावि /बाराविच्या परिक्षां मधे बोर्डात जास्त संख्येने, चांगल्या गुणांनी पास होणारया मुलि कुठे जातात हा प्रश्न विश्वास नांगरे पाटील त्यांच्या कवितेत विचारतात. मग हा प्रश्न त्या मुलिंना विचारण्यात येतो त्या पेक्षा तो त्यांच्या आयुष्यात येणारया  पुरूषाला विचारला जावा अस वाटत नाही का? मग ज्योतिबांचा शो...

बालपणी चे रंग न्यारे ,उधळूया संगे सारे

Image
    बालपणीचे न्यारे रंग बघून वाटल किती छान असत ना  बालपण आणि बालमन,निरागस , निश्चिंत  .    मधे मधे छान बालपणीची आठवण देणारे व्हिडीओज व्हाॅट्सअप वर येत असतात,तेव्हाचे खेळ ,तो स्वस्त पण मस्त खाऊ ,ते मित्रां सोबत निवांत क्षण.    सोबत आत्ता हिरावलेल बालपण , मुलांच्या विश्वात शिरलेली स्पर्धा, सतत डोळ्यांसमोर असलेल स्क्रिन या सर्वांचा या मुलांवर होणारा परिणाम सांगणारे लेख.   पण जस करोना नंतर लाॅकडाऊन थोड शिथील झाल आणि पालकांनाही मुलांच्या कोंडमारयाची ,त्यांच्या भावनिक कोंडीची जाणीव झाली तस पालक ही मुलांना थोडी मोकळीक दयायला लागले आणि पुन्हा किलबिलाटा ने जश्या शाळा बहरला लागल्या ,तसेच रस्ते, बागा ,मैदान ही मुलांनी बहरायला लागली.     जिथे खेळायला मैदान आहेत तिथे मुल हमखास दिसतातच खेळतांना . बरयाच महिन्या नंतर मित्रांना भेटलेले हे संवगडी ऐकमेकांच्या सहवासाला आसुसलेले सतत सोबत राहू इच्छीता त , मग कितीही वाद होत असले  त्यांच्यात तरी एखादा नमत घेऊन पुढे खेळ सुरू---- अगदी जेवणाची वेळ टळली तरी भुकेची जाणिव नाही ,ना घराची ओढ,न आईचा धाक, न अभ्...